द्रविड बनला सल्लागार
By Admin | Updated: June 30, 2014 12:47 IST2014-06-30T01:20:01+5:302014-06-30T12:47:21+5:30
भारताच्या आगामी इंग्लंड दौ:यातील अडचणी लक्षात घेता भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची संघाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

द्रविड बनला सल्लागार
>नवी दिल्ली : भारताच्या आगामी इंग्लंड दौ:यातील अडचणी लक्षात घेता भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची संघाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी ही माहिती दिली.
9 जुलैपासून सुरू होणा:या या मालिकेत द्रविड भारतीय फलंदाजांना टिप्स देणार आहे. इंग्लंडमध्ये द्रविडची कामगिरी पाहता त्याला ही जबाबदारी देऊन महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे क्रीडा वतरुळात म्हटले जात आहे. पटेल म्हणाले, प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी द्रविडला सल्लागार म्हणून नेण्याची विनंती केली होती आणि त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल, असे मत त्यांनी मांडले होते. 2क्12 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा द्रविड पहिल्यांदाच राष्ट्रीय संघाशी पुन्हा एकदा जोडला जाणार आहे. याआधी भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी द्रविडला प्रशिक्षक बनविण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्या वेळी द्रविडने काही कारणास्तव ही जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. (वृत्तसंस्था)