रोड्रिगेजचा डबल धमाका

By Admin | Updated: June 30, 2014 01:24 IST2014-06-30T01:24:44+5:302014-06-30T01:24:44+5:30

कोलंबियाने फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दोनदा विजेतेपद पटकाविणा:या उरुग्वेचा 2-क् ने पराभव केला

Double explosion of Rodriguez | रोड्रिगेजचा डबल धमाका

रोड्रिगेजचा डबल धमाका

>रियो दी जानेरिओ : जेम्स रोड्रिगेजने 28 व 5क् व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर कोलंबियाने फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दोनदा विजेतेपद पटकाविणा:या उरुग्वेचा 2-क् ने पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. क्वॉर्टर फायनलमध्ये कोलंबियाला यजमान ब्राझीलच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्याआधी, खेळल्या गेलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत ब्राझीलने पेनल्टी शूटआऊटमध्ये चिली संघाची झुंज 3-2 ने मोडून काढली. 
रोड्रिगेजने दोन शानदार गोल नोंदवित लुईस सुआरेजबाबतची चर्चा थांबविली. सामन्यापूर्वी उरुग्वेच्या या स्टार स्ट्रायकरने इटलीच्या जॉजिर्यो चिलिनी याचा चावा घेतल्याच्या घटनेची चर्चा होती. पण, माराकाना स्टेडियममध्ये सामना संपल्यानंतर सर्वाच्या ओठावर केवळ एकच नाव होते ते म्हणजे रोड्रिगेज. 
रोड्रिगेजच्या कामगिरीच्या जोरावर कोलंबिया संघाला प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविता आले. त्यामुळे 4 जुलै रोजी खेळल्या जाणा:या लढतीच्या वेळी पूर्ण स्टेडियम पिवळ्या रंगात रंगलेले दिसणार असल्याचे निश्चित झाले. त्या दिवशी जोस पकरमॅनचा संघ पाचवेळा जेतेपदाचा मान मिळविणा:या यजमान संघाच्या आव्हानाला सामोरा जाणार आहे. उरुग्वेने सुआरेजच्या स्थानी डिएगो फोर्लानला संधी दिली, तर कोलंबियाचे प्रशिक्षक पॅकरमॅन यांनी सेंटर फॉरवर्ड ज्ॉक्सन मार्टिनेज व टियोफिलो गुटिरेज यांची निवड करीत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. सुआरेजविना उरुग्वेचा संघ कमकुवत भासत होता. एडिनसन कवानीने त्याची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करताना सवरेत्तम खेळ केला, पण संघाचा पराभव टाळण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. (वृत्तसंस्था)

Web Title: Double explosion of Rodriguez

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.