विराट कोंहलीला ‘सचिन’ बनवू नका!
By Admin | Updated: February 14, 2015 00:25 IST2015-02-14T00:25:46+5:302015-02-14T00:25:46+5:30
भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील सामन्याला आता काही तासच उरले आहेत. या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल

विराट कोंहलीला ‘सचिन’ बनवू नका!
नवी दिल्ली : भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील सामन्याला आता काही तासच उरले आहेत. या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते सुपर स्टार फलंदाज विराट कोहलीकडे. या महामुकाबल्यात त्याची बॅट कमाल करेल काय? यावर चर्चा रंगत आहे.विराटची तुलना आता सचिन तेंडुलकरसोबतही होत आहे. सध्याची विराटची स्थिती सहा विश्वचषक खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरसारखीच असल्याचे सांगण्यात येत आहे. सचिनने १९९२ मध्ये विश्वचषक खेळायला सुरुवात केली होती आणि प्रत्येक वेळा त्याच्या ‘बल्ला’ चालावा, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. अखेर सचिनने सहाव्या म्हणजे २०११ चा विश्वचषक उंचावण्याचा मान मिळवला. आता जगातील तमाम दिग्गज विराटला भारतीय क्रिकेट नवा ‘कोहीनूर’ म्हणून संबोधत आहेत आणि सर्वांचे सांगणे एकच आहे की, विराट हा भारताला विश्वचषक जिंकून देउ शकतो. विराटवर अपेक्षांचे ओझे अधिक आहे. त्यात चाहत्यांनी त्याला ‘सचिन’ बनवले आहे. विराटवर दबाव वाढवू नका, त्याच्यावर विश्वास ठेवा, असेही काही दिग्गज सांगत आहे. दुसरीकडे, खुद्द सचिनलाही विराटकडून मोठ्या आशा आहेत.
(वृत्तसंस्था)