आशा सोडू नका, अपंग क्रिकेटपटू अमिर हुसैनचे विराटने दिले उदहारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 16:28 IST2016-04-01T16:28:53+5:302016-04-01T16:28:53+5:30

वेस्ट इंडिजकडून जिव्हारी लागणारा पराभव झाल्यानंतर अनेकजण निराश झाले आहेत. मात्र या परिस्थितीतही टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशा सोडलेली नाही.

Do not give up hope, cousin Amir Hussain's example | आशा सोडू नका, अपंग क्रिकेटपटू अमिर हुसैनचे विराटने दिले उदहारण

आशा सोडू नका, अपंग क्रिकेटपटू अमिर हुसैनचे विराटने दिले उदहारण

 ऑनलाइन लोकमत 

 
नवी दिल्ली, दि. १ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत वेस्ट इंडिजकडून जिव्हारी लागणारा पराभव झाल्यानंतर अनेकजण निराश झाले आहेत. मात्र या परिस्थितीतही टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशा सोडलेली नाही. त्याने आशा सोडू नका, आयुष्य संपत नाही. ही तर सुरुवात असते असे टि्वट केले आहे. 
 
या टि्वटमध्ये त्याने हाताविना क्रिकेट खेळणारा जम्मू-काश्मिरचा अपंग क्रिकेट संघाचा कर्णधार अमिर हुसैनचे उदहारण दिले आहे. वयाच्या आठव्यावर्षी आमिरने त्याचे दोन्ही हात गमावले. पण आयुष्यातील या सर्वात मोठया धक्क्यानंतरही तो त्याच्या लक्ष्यापासून विचलित झाला नाही. अनंत अडचणींवर मात करुन त्याने क्रिकेटपटू बनण्याचे त्याचे लक्ष्य साध्य केले. 
 
२६ वर्षांचा अमिर आज जम्मू-काश्मिरच्या अपंग क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. विराटने त्याच्या टि्वटमध्ये अमिरला सलाम केला आहे. विराटने त्याच्या टि्वटमध्ये अमिरच्या व्हिडीओची लिंकही दिली आहे. या मेसेजमधून विराटने जे चाहते निराश झाले आहेत त्यांना पराभवाने आपण खचलो नसून, तुम्ही सुद्धा खचू नका असा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. 
 
 

Web Title: Do not give up hope, cousin Amir Hussain's example

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.