शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविचचा विजेतेपदाचा चौकार

By admin | Updated: November 24, 2015 00:24 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने अंतिम फेरीत रॉजर फेडररला पराभूत करीत सलग चौथ्यांदा एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले.

लंडन : जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने अंतिम फेरीत रॉजर फेडररला पराभूत करीत सलग चौथ्यांदा एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले.२८ वर्षीय जोकोविचने सहाव्यांदा चॅम्पियन फेडररचा सलग सेटस्मध्ये ६-३, ६-४ असा पराभव केला आणि अव्वल आठ मानांकित खेळाडू दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत आपणच ‘किंग’ आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले. त्याचबरोबर तो स्पर्धेच्या ४६ वर्षांच्या इतिहासात सलग चार वेळेस विजेता ठरणारा पहिला खेळाडू ठरला आहे.यावर्षी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविणाऱ्या जोकोविचला पहिला सेट ६-३ जिंकण्यात फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.दुसऱ्या सेटमध्ये या दोन्ही खेळाडूंदरम्यान खूप संघर्ष पाहायला मिळाला. सेटमध्ये ३-४ पिछाडीवर पडल्यानंतर फेडररने सलग पाच गुण घेताना मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु चॅम्पियनप्रमाणे खेळणाऱ्या जोकोविचने फेडररला चुका करण्यास भाग पाडले. विजेतेपद जिंकून वर्षाचा जबरदस्त समारोप केल्यानंतर जोकोविचने म्हटले, ‘मी ग्रुप लढतीत मिळालेल्या पराभवातून धडा घेतला आणि या लढतीत जास्त परतीचे फटके मारले. ट्रॉफी जिंकण्याने या हंगामाचा समारोप करणे यापेक्षा जास्त काही चांगले होऊ शकत नाही. हे सत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे.’या विजयामुळे जोकोविचचे फेडररविरुद्ध कारकिर्दीतील रेकॉर्ड २२-२२ असे झाले आहे. चॅम्पियन खेळाडूने उपांत्य फेरीत स्पेनच्या राफेल नदाललादेखील धूळ चारली होती. त्याच्याविरुद्ध त्याचे रेकॉर्ड २३-२३ असे झाले आहे.दुसरीकडे १७ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडरर पराभवानंतर म्हणाला, ‘जोकोविचने कोर्टवर सुरेख खेळ केला. तथापि, मी पहिला सेट गमाविल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्नदेखील केला; परंतु यश मिळाले नाही. जोकोविचचे अभिनंदन; परंतु त्याला अव्वल राहण्यासाठी खूप मेहनत करण्याची आणि दुखापतीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.’