अँडी मरेला नमवून जोकोविचची माद्रिद ओपनच्या विजेतेपदाला गवसणी

By Admin | Updated: May 9, 2016 10:13 IST2016-05-09T08:58:34+5:302016-05-09T10:13:52+5:30

जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरूष खेळाडू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अँडी मरेला नमवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

Djokovic defeats Andy Murray to win Madrid Open title | अँडी मरेला नमवून जोकोविचची माद्रिद ओपनच्या विजेतेपदाला गवसणी

अँडी मरेला नमवून जोकोविचची माद्रिद ओपनच्या विजेतेपदाला गवसणी

ऑनलाइन लोकमत
माद्रिद, दि. ९ - जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरूष खेळाडू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अँडी मरेला नमवून स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. जोकोविचने मरेचा ६-२, ३-६, ६-३ असा थेट पराभव करत अंतिम फेरी जिंकली. 
सन २०१३ नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेल्या जोकोविचने या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आणि शेवटच्या फेरीतही आपला उंचावलेला खेळ कायम राखत विजेतेपद पटकावले. माद्रिद ओपन स्पर्धेच्या या विजेतेपदामुळे जोकोविचने स्पेनच्या राफेल नदालला मागे टाकत '२९ एटीपी मास्टर्स' टायटल्स पटकावली आहेत. 
दरम्यान या पराभवामुळे अँडी मरेने त्याचे जागतिक क्रमवारातील द्वितीय मानांकन गमावले असून रॉजर फेडरर आता दुस-या स्थानावर आला आहे. 
 

Web Title: Djokovic defeats Andy Murray to win Madrid Open title