जिल्हा मानांकन टेेबल टेनिस स्पर्धा १८ पासून
By Admin | Updated: July 13, 2014 00:44 IST2014-07-11T21:45:34+5:302014-07-13T00:44:16+5:30
नाशिक : रत्नमाला टकले स्मृती जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा १८ जुलैपासून होणार असल्याची माहिती जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव शेखर भंडारी यांनी दिली़

जिल्हा मानांकन टेेबल टेनिस स्पर्धा १८ पासून
नाशिक : रत्नमाला टकले स्मृती जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा १८ जुलैपासून होणार असल्याची माहिती जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव शेखर भंडारी यांनी दिली़
नाशिक जिमखाना येथे सकाळी १० वाजता या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे़ जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन व स्त्री मंडळाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे़ या स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, युथ मुले, मुली, ज्युनिअर - सबज्युनिअर मुले, मुली, कॅडेट मुले, मुली अशा विविध गटांत होणार आहेत़ या स्पर्धेतील विजेत्या खेळाडंूची राज्य अजिंक्य स्पर्धेसाठी निवड होणार आहे़ या स्पर्धेसाठी खेळाडूंनी १५ जुलैपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन जिमखान्याच्या वतीने करण्यात आले आहे़