जिल्हा ॲथ्लेटिक्स

By Admin | Updated: July 20, 2015 23:59 IST2015-07-20T23:59:29+5:302015-07-20T23:59:29+5:30

सायली, गजानन जिल्हा

District Athletics | जिल्हा ॲथ्लेटिक्स

जिल्हा ॲथ्लेटिक्स

यली, गजानन जिल्हा
ॲथ्लेटिक्स संघाचे कर्णधार
नागपूर : पुण्यातील बापुसाहेब सणस मैदानावर उद्या मंगळवारपासून सुरू होत असलेल्या राज्य कनिष्ट गट (२० वर्षे) राज्य ॲथ्लेटिक्स स्पर्धेत सायली वाघमारे आणि गजानन ठाकरे हे क्रमश: मुली आणि मुलांच्या नागपूर जिल्हा संघाचे नेतृत्व करणार आहेत. जिल्हा संघटनेचे सचिव शरद सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.
सायलीने याआधी १८ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत आणि अ.भा. आंतरविद्यापीठ स्पर्धेत पदक जिंकले आहे. ती ८०० आणि ४०० मीटर दौडीत सहभागी होईल. गजानन ठाकरे हा लांब उडीतील खेळाडू आहे. जिल्हा संघ असा : मुले गजानन ठाकरे कर्णधार, ईशाद अली, भास्कर अतकरे, मयूर मेश्राम, शुभम छेगी, अनिकेत व्यवहारे, पराग माकडे, कमलेश रंगारी, शेख फारुकी, हेमंत ठाकरे, अखिल गायगवळी, गौरव मिठासे, पंकज उरकुडे, रणजित मेंढे, शुभम मारबते.
मुली : सायली वाघमारे कर्णधार, पूजा दशपुत्रे, रूपाली नक्सरे, शीतल मेश्राम, सायली कोट्टेवार, प्रियंका मने, राजश्री पद्मगीरवार, सारिका राऊत आणि अंजली शाम. प्रशिक्षक रोहिणी राऊत, व्यवस्थापक विक्की राऊत. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: District Athletics