चर्चा तर होणारच... रोहित दिसला मुलीसोबत
By Admin | Updated: March 5, 2015 15:39 IST2015-03-05T15:39:44+5:302015-03-05T15:39:44+5:30
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा पर्थमध्ये एका तरुणीसोबत फिरताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

चर्चा तर होणारच... रोहित दिसला मुलीसोबत
ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ५ - बीसीसीआयने वर्ल्डकपमध्ये प्रेयसी अथवा पत्नीला सोबत नेण्यास भारतीय क्रिकेटपटूंवर बंदी घातली असली तरी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा पर्थमध्ये एका तरुणीसोबत फिरताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. या वृत्तावर रोहितने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
वर्ल्डकपमध्ये पर्थमध्ये भारताचे दोन सामने असून यातील पहिला यूएईसोबतचा सामना पार पडला असून उद्या भारताची लढत वेस्ट इंडिजशी होणार आहे. या दोन सामन्यांमध्ये बराच अवधी मिळत असल्याने भारतीय खेळाडू सरावासोबतच शहरात भटकंतीसाठी बाहेर पडतात. भारतीय संघ सध्या ह्यात रिजन्सी या हॉटेलमध्ये राहत आहे. रोहित शर्मा हयात रिजन्सीपासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला. या हॉटेलमध्ये रोहितसोबत एक तरुणी दिसते. याच तरुणीसोबत रोहितने डिनरही घेतल्याचे समोर आले आहे. हे दोघेही पर्थमधील रस्त्यावर चालत फिरताना दिसत असून हा सर्व प्रकार एका वृत्तवाहिनीच्या कॅमे-यात कैद झाला आहे. रोहितसोबतची ती तरुणी कोण याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.