रॉबेनच्या पेनल्टीवर चर्चा

By Admin | Updated: July 1, 2014 02:39 IST2014-07-01T02:39:26+5:302014-07-01T02:39:26+5:30

विश्वचषकातील सोमवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोवर नेदरलॅंडने मिळवलेला विजय हा ‘मिरॅकल’ (चमत्कार)होता, असे डच वृत्तपत्रंनी म्हटले आहे.

Discussion on Robben Penalty | रॉबेनच्या पेनल्टीवर चर्चा

रॉबेनच्या पेनल्टीवर चर्चा

>हॉगे : विश्वचषकातील सोमवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोवर नेदरलॅंडने मिळवलेला विजय हा ‘मिरॅकल’ (चमत्कार)होता, असे डच वृत्तपत्रंनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, त्यांचा स्ट्रायकर आर्येन रॉबेनला मिळालेली पेनल्टी सुद्धा चर्चेचा विषय ठरली. 
सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना पिछाडीवर असलेल्या नेदरलॅंडने आक्रमक पवित्र घेतला होता. आणि त्यांना त्याचे यशही मिळाले. स्नायडरने हा गोल केला. त्याआधी, काही मिनिटे बाकी असताना आर्येन रॉबेनने पेनल्टी एरियामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूला चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुभवी डिफेंडर राफा मार्केसने पाय उचलला तेव्हा बायर्न म्युनिचचा हा स्टार खेळाडू खाली पडला आणि पंच पेड्रो प्रोएंका यांनी पेनल्टीचा इशारा केला. या निर्णयावर डच मिडियावर चर्चा रंगली. काही समालोचकांनी या किकला आवश्यक तर काहींनी पात्र असल्याचे सांगितले. मार्किसने जेव्हा रॉबेनला प्रथम धक्का दिला आणि हेक्टर मोरेन्नोला त्याला आडवा पाडले .

Web Title: Discussion on Robben Penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.