आंतर महाविद्यालय खो-खो स्पर्धेत हिरे महाविद्यालय अजिंक्य

By Admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:34+5:302014-08-21T21:45:34+5:30

नाशिक : वणी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाने पटकावले. संघातील स्वप्नील चिकणे, राकेश राजगुरे, राहुल खरात, रतन शर्मा, विकी डावरे, पुंडलिक पवार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेमध्ये कळवण, देवळा, सुरगाणा, नाशिकचे केटीएचएम महाविद्यालय व निफाड महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्वप्नील चिकणे, राकेश राजगुरे, राहुल खरात, रतन शर्मा यांची नाशिक विभागाच्या आंतर विभागीय महाविद्यालीन स्पर्धेसाठी संघात निवड झाली आहे. संघाला मंदार देशमुख, उमेश आठवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Diamond College Ajinkya in Inter College Kho-Kho Tournament | आंतर महाविद्यालय खो-खो स्पर्धेत हिरे महाविद्यालय अजिंक्य

आंतर महाविद्यालय खो-खो स्पर्धेत हिरे महाविद्यालय अजिंक्य

शिक : वणी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाने पटकावले. संघातील स्वप्नील चिकणे, राकेश राजगुरे, राहुल खरात, रतन शर्मा, विकी डावरे, पुंडलिक पवार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेमध्ये कळवण, देवळा, सुरगाणा, नाशिकचे केटीएचएम महाविद्यालय व निफाड महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्वप्नील चिकणे, राकेश राजगुरे, राहुल खरात, रतन शर्मा यांची नाशिक विभागाच्या आंतर विभागीय महाविद्यालीन स्पर्धेसाठी संघात निवड झाली आहे. संघाला मंदार देशमुख, उमेश आठवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो : २१एसपीओ०१
वणी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेतील विजयी हिरे महाविद्यालयाच्या संघासमवेत प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, डॉ. नंदू पवार, डॉ. ए. व्ही. पाटील, डॉ. मृणाल भारद्वाज, डॉ. दिनेश कराड आदि.

Web Title: Diamond College Ajinkya in Inter College Kho-Kho Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.