धोनीचा हरवलेला मोबाइल सापडला
By Admin | Updated: March 20, 2017 00:09 IST2017-03-20T00:09:21+5:302017-03-20T00:09:21+5:30
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा हरवलेला मोबाइल फोन सापडल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

धोनीचा हरवलेला मोबाइल सापडला
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा हरवलेला मोबाइल फोन सापडल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. हॉटेल परिसरात लागलेल्या आगीदरम्यान धोनीचा मोबाइल फोन हरवला होता. चुकीने एका व्यक्तीने हा मोबाईल फोन घेतला. ती व्यक्ती अन्य स्टाफ क्रिकेटरच्या खोल्यांची सफाई करण्यासाठी गेली होती. मोबाईल कोणाचा आहे याची माहिती न घेता त्याने हा मोबाइल स्वत:जवळ ठेवला. पोलिसांच्या चौकशीनंतर त्याने मोबाइल घेतल्याचे मान्य करुन तो त्याने आम्हाला दिला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याआधी धोनीने द्वारकाच्या वेलकम हॉटेल परिसरात १७ मार्चला आगीच्या घटनेदरम्यान मोबाइल चोरी झाल्याची तक्रार केली होती.