धोनीचा हरमोड
By Admin | Updated: February 17, 2015 00:46 IST2015-02-17T00:46:43+5:302015-02-17T00:46:43+5:30
वन-डे वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर महेंद्रसिंह धोनीला स्टम्पस्वरील बेल्स सोबत घेऊन जाता आल्या नाहीत़ त्यामुळे या कर्णधाराची निराशा झाली़

धोनीचा हरमोड
मेलबोर्न : वन-डे वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर महेंद्रसिंह धोनीला स्टम्पस्वरील बेल्स सोबत घेऊन जाता आल्या नाहीत़ त्यामुळे या कर्णधाराची निराशा झाली़
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये सामन्यादरम्यान एलईडी स्टम्पस्चा उपयोग करण्यात येत आहे़ खेळाडू त्रिफळाचीत झाला किंवा या स्टम्पस्ला हात लागला तर त्या चमकायला लागतात़
पाकिस्तानवर मिळविलेल्या एतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने एक बेल्स उचलली आणि मैदानाबाहेर जायला लागला़ तेव्हा स्क्वेअर लेगवर असलेले पंच इयान गुल्ड यांनी धोनीकडून ही बेल्स परत घेतली आणि पुन्हा स्टम्पस्वर ठेवली़(वृत्तसंस्था)