धोनीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

By Admin | Updated: August 19, 2014 00:43 IST2014-08-19T00:43:48+5:302014-08-19T00:43:48+5:30

खेळाडूंनी डंकन फ्लेचर यांची प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली असून, महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Dhoni's captaincy question marks | धोनीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

धोनीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध ओव्हलमध्ये पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव 244 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी खेळाडूंनी डंकन फ्लेचर यांची प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली असून, महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी खेळाडूंनी फ्लेचर यांच्या भूमिकेवर टीका करताना, त्यांचे योगदान ‘शून्य’ असल्याची टीका करताना त्यांची हकालपट्टी करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. 
माजी कर्णधार अजित वाडेकर म्हणाले,‘लॉर्ड्सच्या खडतर खेळपट्टीवर आम्ही विजय मिळविल्यानंतर फ्लेचर काय करीत होते? त्यांच्याकडे कुठलीही योजना नाही. त्यामुळे त्यांनी आता पद सोडायला हवे.’ ओव्हलमध्ये पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारताला 4क् वर्षातील सर्वात मोठय़ा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. यावरून भारताच्या लाजिरवाण्या कामगिरीची प्रचिती येते. हा सामना केवळ तीन दिवसांमध्ये संपला. या मालिकेत इंग्लंडने 3-1ने विजय मिळविला. अशोक मल्होत्र यांच्या मते, कसोटी कर्णधार म्हणून धोनीची कारकीर्द संपलेली आहे. 
मल्होत्र म्हणाले, ‘वन-डे व टी-2क् क्रिकेटसाठी धोनी शानदार कर्णधार आहे; पण कसोटी क्रिकेटचा विचार करता बरेच काही करण्याची गरज आहे. त्याच्याकडे अ, ब किंवा क अशा पर्यायी योजना नाहीत. कसोटी क्रिकेटचा विचार करता त्याची मानसिकता संकुचित आहे. गांगुली यापेक्षा सरस होता. कारण, तो कसोटी कर्णधारपदाचा आनंद घेत होता आणि आपल्या कामगिरीचा अभिमान बाळगत होता.’ फ्लेचर यांना प्रशिक्षक म्हणून अनेक संधी मिळालेल्या असून, आता त्यांची हकालपट्टी करणो आवश्यक आहे, असेही मल्होत्र म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
धोनीबाबत बोलताना वाडेकर म्हणाले, ‘धोनीने तंत्रमध्ये बदल करीत चांगली फलंदाजी केली, पण कर्णधार म्हणून तो आपल्या रणनीतीमध्ये बदल का करीत नाही, हे मला कळलेले नाही. त्याने थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात केला नाही. इंग्लंडने या क्षेत्रतून अधिक धावा वसूल केल्या. त्याचप्रमाणो संघाची निवड करताना रविचंद्रन आश्विनला पहिल्या कसोटीपासून खेळविणो आवश्यक होते.’
 
माजी महान फलंदाज गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या मते, खडतर परिस्थितीमध्ये धोनीला आश्चर्य घडण्याची आशा असते.  विश्वनाथ म्हणाले, ‘मी त्याच्या यष्टिरक्षण व कर्णधारपदाच्या शैलीबाबत समाधानी नाही. तो वेगळा विचार करतो. त्याला नेहमी आश्चर्य घडण्याची आशा असते. आश्चर्य नेहमी घडत नसते.’
 
माजी खेळाडू अंशुमन 
गायकवाड यांनीही फ्लेचरवर टीका केली. गायकवाड म्हणाले, ‘मी यापूर्वी प्रशिक्षकपद भूषविले आहे. प्रशिक्षकाने संघाच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असावे. प्रशिक्षकाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नसेल, तर याचा अर्थ खेळाडू प्रशिक्षकांचे ऐकत नाहीत. अशा परिस्थितीत प्रशिक्षक नियुक्त करण्याची गरज काय?’ असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.
 
माजी  फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना म्हणाले, ‘संघात फ्लेचर यांचे योगदान ‘शून्य’ आहे. दुसरा एक माजी कर्णधार के. श्रीकांतचे फ्लेचरबाबत असेच मत आहे. श्रीकांत म्हणाला, ‘फ्लेचर यांचे योगदान लाभले नाही.
 
एका कसोटी सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणारे मधल्या फळीतील फलंदाज चंदू बोर्डे यांनी खेळाडूंच्या तंत्रवर टीका केली. बोर्डे म्हणाले, ‘युवा खेळाडूंनी तंत्रमध्ये बदल केला नाही, पण लॉर्ड्समध्ये इंग्लंडच्या पराभवानंतर अॅलिस्टर कुकसारख्या खेळाडूने मात्र बदल करण्यास प्राधान्य दिले. भुवनेश्वर कुमारच्या स्विंग मा:याला तोंड देण्यासाठी कुकने क्रीजपासून काही फूट बाहेर उभे राहण्याचा निर्णय घेतला.’
 
4माजी कर्णधार सुनील गावसकर म्हणाले, भारतीय खेळाडूंनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडले नाही. त्यांनी कसोटीसाठी नेटमध्ये हवा तेवढा सराव केला नाही. धोनीने जर धावा केल्या नसत्या, तर संघ 1क्क् पेक्षा कमी धावांत बाद झाला असता. कस्र्टन ज्या पद्धतीने संघाचा सराव घेत होते, त्या पद्धतीने सध्या सराव होत नाहीये. खेळ खराब झाला तर प्रशंसक प्रश्न विचारणारच.
 
पराभवानंतरही धोनीची ‘वेट अँड वॉच’ भूमिका
विदेशात अनेक मानहानिकारक पराभव वाटय़ाला आल्यानंतरही भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद कायम राखण्यात यश मिळवले आहे. 
रविवारी ओव्हल मैदानावर भारताचा एक डाव आणि 244 धावांनी नामुष्कीजनक पराभव झाला. कसोटी इतिहासातील हा सर्वात मोठा तिसरा पराभव. त्याआधी कोलकाता येथे 1958 मध्ये वेस्ट इंडिजने भारताचा एक डाव आणि 336 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर 1974 मध्ये लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडनेएक डाव आणि 285 धावांनी मात केली होती. 
कर्णधारपदाच्या नैतिक जबाबदारीबाबत काही विचार करीत आहेस का? यावर मात्र धोनीने बचावात्मक पवित्र घेतला. तो म्हणाला, 2क्11मध्ये सुद्धा मला 
हाच प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हाही ‘वेट अॅँड वॉच’ असे 
म्हटले होते, आताही तेच म्हणतोय 
‘वेट अॅँड वॉच’! 
ओव्हलवरील पराभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी माङयासाठी कठीण आहे; कारण पराभवाला विविध कारणो आहेत. प्रत्येक सामन्यात आम्ही धावांसाठी चाचपडलो. खरी झुंज देण्यासाठी आवश्यक धावा आम्ही उभारू शकलो नाही. लॉर्ड्सवरील अनपेक्षित विजयानंतर  फलंदाजी डगमगली. जर संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही अपयशी ठरला तर कर्णधार त्यासाठी किती जबाबदार ठरतो? असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
वैयक्तिकरीत्या धोनीचा हा 13वा कसोटी पराभव. 2क्11 मधील पराभव धोनीलासुद्धा दुखावणारा होता; कारण या संघात दिग्गज आणि अनुभवी खेळाडू होते. 

 

Web Title: Dhoni's captaincy question marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.