धोनी भाई, तू नेहमीच माझा कर्णधार राहशील - विराट कोहली

By Admin | Updated: January 6, 2017 13:23 IST2017-01-06T12:33:26+5:302017-01-06T13:23:55+5:30

महेंद्रसिंह धोनीने वनडे आणि टी-20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याजागी विराट कोहलीची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कर्णधारपदी निवड जवळपास निश्चित आहे.

Dhoni brother, you will always be my captain - Virat Kohli | धोनी भाई, तू नेहमीच माझा कर्णधार राहशील - विराट कोहली

धोनी भाई, तू नेहमीच माझा कर्णधार राहशील - विराट कोहली

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 6 - महेंद्रसिंह धोनीने वनडे आणि टी-20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याजागी विराट कोहलीची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कर्णधारपदी निवड जवळपास निश्चित आहे. विराटनेही कर्णधारपदाची धुरा संभाळण्याआधी टि्वटरच्या माध्यमातून धोनीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
 
धोनी तुझ्या नेतृत्वाने प्रेरणा निर्माण केली, तू नेहमीच माझा कर्णधार राहशील असे टि्वट विराटने केले आहे.  2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून विराट धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. 
 
विराटच नव्हे मायकल क्लार्क, मायकल वॉगन, शाहीद आफ्रिदी आणि झहीर अब्बास या सर्वांनी धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक करताना धोनीने भारतीय क्रिकेटवर आपली छाप उमटल्याचे म्हटले आहे.  

Web Title: Dhoni brother, you will always be my captain - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.