धोनी बनणार ‘नॉट आऊट १९९’
By Admin | Updated: October 15, 2016 01:41 IST2016-10-15T01:41:38+5:302016-10-15T01:41:38+5:30
विश्वचषक विजेत्या वन- डे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनप्रसंगावर आधारित ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स

धोनी बनणार ‘नॉट आऊट १९९’
धर्मशाला : विश्वचषक विजेत्या वन- डे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनप्रसंगावर आधारित ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर १०० कोटींच्या कमाईकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत नेतृत्व करीत धोनीकडेही ‘नॉट आऊट १९९’ बनण्याची संधी असेल.
२००७ ते २०१६ या कालावधीत धोनीने १९४ वेळा टीम इंडियाचे नेतृत्व केले. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांत तो देशाचे नेतृत्व करीत १९९ चा आकडा गाठेल. धोनीच्या नेतृत्वात भारताने १९४ पैकी १०७ सामने जिंकले. ७२ सामन्यांत संघाचा पराभव झाला, तर चार सामने टाय झाले. ११ सामन्यांचा निकाल लागला नव्हता. या मालिकेत धोनीकडे वन-डे क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार बनण्याचीदेखील संधी राहील.