वेस्ट इंडिजचा बरोबरीचा निर्धार

By Admin | Updated: October 22, 2015 00:44 IST2015-10-22T00:44:42+5:302015-10-22T00:44:42+5:30

यजमान श्रीलंकेविरुध्द पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून, दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी वेस्ट इंडिज

The determination of the West Indies | वेस्ट इंडिजचा बरोबरीचा निर्धार

वेस्ट इंडिजचा बरोबरीचा निर्धार

कोलंबो : यजमान श्रीलंकेविरुध्द पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून, दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी वेस्ट इंडिज संघ मैदानात उतरेल. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू गॅरी सोबर्स यांची उपस्थिती या सामन्यासाठी लाभणार असल्याने, त्यांच्या उपस्थितीत खेळ उंचावण्याचा विश्वास वेस्ट इंडिज संघाला आहे.
वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटीत डावाने पराभवाच्या नामुष्कीस सामोरे जावे लागले. या सामन्यात लंकेच्या रंगना हेराथने निर्णायक कामगिरी करताना दहा बळी घेतले होते. चांगल्या सुरुवातीनंतरही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले होते, तसेच क्षेत्ररक्षणामध्येही वेस्ट इंडिजची कामगिरी सुमार झाली. याचा फटका पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजला बसला. (वृत्तसंस्था)

Web Title: The determination of the West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.