वर्चस्व गाजवूनही मुंबईचा इराणी चषकात शेष भारताकडून पराभव
By Admin | Updated: March 10, 2016 20:50 IST2016-03-10T18:05:13+5:302016-03-10T20:50:28+5:30
इराणी चषक स्पर्धेत पहिल्या तीन दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही मुंबईला शेष भारताकडून पराभवाची नामुष्की सहन करावी लागली.

वर्चस्व गाजवूनही मुंबईचा इराणी चषकात शेष भारताकडून पराभव
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - इराणी चषक स्पर्धेत पहिल्या तीन दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही मुंबईला शेष भारताकडून पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. मुंबईने विजयासाठी ठेवलेले ४८० धावांचे लक्ष्य शेष भारताने चार गडी राखून आरामात पार केले.
पहिल्या डावात मुंबईने ६०३ धावांचा डोंगर उभारल्यानंतर शेष भारताचा पहिला डाव ३०६ धावात आटोपला होता. मुंबईकडे २९७ धावांची आघाडी होती. पण दुस-या डावात मुंबईचा डाव शेष भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर १८२ धावात आटोपला. पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर मुंबईने शेष भारतासमोर ४८० धावांचे लक्ष्य ठेवले होते.
चौथ्या दिवशी शेष भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा करुन भक्कम सुरुवात केली होती. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शेष भारताला ३८० धावा करायच्या होत्या. सलामीवीर फझलचे शानदार शतक (१२७) धावा, करुण नायरची (९२) धावांची खेळी, स्टुअर्ट बिन्नीच्या (५४) आणि जॅक्सनच्या नाबाद (५९) धावांच्या बळावर शेष भारताने आरामात लक्ष्य पार करुन इराणी चषक जिंकला.