मूर्तिजापूरचे विद्यार्थी व्हॉलीबॉल स्पर्धेत विभागीय स्तरावर

By Admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:34+5:302014-09-13T22:59:34+5:30

मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षाच्या आतील मुलींच्या गटामध्ये अंतिम फेरीत स्व. परमानंद मालाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी आकोट संघाचा पराभव करून विजय संपादन करून शालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वत:चे स्थान निश्चित केले होते.

At the departmental level of Murtijapur students' volleyball competition | मूर्तिजापूरचे विद्यार्थी व्हॉलीबॉल स्पर्धेत विभागीय स्तरावर

मूर्तिजापूरचे विद्यार्थी व्हॉलीबॉल स्पर्धेत विभागीय स्तरावर

र्तिजापूर : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षाच्या आतील मुलींच्या गटामध्ये अंतिम फेरीत स्व. परमानंद मालाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी आकोट संघाचा पराभव करून विजय संपादन करून शालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वत:चे स्थान निश्चित केले होते.
विजेत्या संघामध्ये हर्षल सदार, श्रेयस इंगोले, यश यावले, प्रसाद कथलकर, सक्षम डोंगरदिवे, अजय राठोड, श्रीकांत ठाकरे, पवन चौधरी, अभिनय वैद्य, सुमित वाकोडे, अभिषेक चोपडे, भुवनेश तिरकर या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना संस्थेच्या अध्यक्ष गीताबाई मालाणी, सच्चिदानंद मालाणी, प्रतापसिंग पाटील, अशोक सोमाणी, भरत मालाणी, स्नेहल मालाणी, संपन्न मालाणी, सागर आखरे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला शर्मा, पर्यवेक्षिका दीपमाला पालीवाल, अपर्णा गुल्हाने तसेच क्रीडा शिक्षक मुकुंद पैकट आणि अन्य शिक्षकांनी मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: At the departmental level of Murtijapur students' volleyball competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.