Delay in National Awards this year? | यंदा राष्ट्रीय पुरस्कार वितरण विलंबाने?

यंदा राष्ट्रीय पुरस्कार वितरण विलंबाने?नवी दिल्ली : कोरोनामुळे यंदा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यास एक किंवा दोन महिने उशिरा होण्याची शक्यता क्रीडा मंत्रालयाने वर्तवली आहे. राष्ट्रपती भवनातून येणाऱ्या अंतिम निर्देशानंतर निर्णय होईल, असे एका अधिकाºयाने सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी अर्थात २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होते. मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनाकडून अद्याप कुठलेही निर्देश आलेले नाहीत. खेळाडूृंच्या अर्जांची छाननी आणि विजेत्यांची निवड करण्यासाठी अद्याप समितीची घोषणा केलेली नाही. (वृत्तसंस्था)

क्रीडा पुरस्कारासंदर्भात काही सूचना येतील याची प्रतीक्षा आहे. यामुळे आयोजन नेमके कधी होईल, हे सांगणे कठीण आहे. कोरोनामुळे राष्ट्रपती भवनात अलिकडे कोणत्याही समारंभाचे आयोजन झालेले नाही. याआधीही हा सोहळा विलंबाने झाला आहे. यंदा २९ आॅगस्टला कार्यक्रम झाला नाही, तर एक किंवा दोन महिने विलंब शक्य आहे. सध्यातरी आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. कोरोनामुळे पुरस्कारांसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती.

Web Title: Delay in National Awards this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.