ेक्रीडा पानासाठी लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी रक्षा खडसे

By Admin | Updated: September 4, 2015 22:44 IST2015-09-04T22:44:57+5:302015-09-04T22:44:57+5:30

सोबत फोटो-०५ सीटीआर ५०- रक्षा खडसे यांचे स्वागत करताना एकनाथराव खडसे. सोबत रुबल अग्रवाल, अस्तिककुमार पांडेय.

Defense Khadse was elected president of Lambi Mahasangh for the game | ेक्रीडा पानासाठी लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी रक्षा खडसे

ेक्रीडा पानासाठी लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी रक्षा खडसे

बत फोटो-०५ सीटीआर ५०- रक्षा खडसे यांचे स्वागत करताना एकनाथराव खडसे. सोबत रुबल अग्रवाल, अस्तिककुमार पांडेय.

जळगाव : भारतीय लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी खासदार रक्षा खडसे यांची नियुक्ती झाली आहे.
संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावाने लंगडी हा खेळ खेळला जात असतो. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आसाम अशा २५ राज्यात हा खेळ खेळला जात असतो. त्यामुळे हा खेळ आता आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. नेपाळ, भुतान,पाकिस्तान, श्रीलंका, थाईलंड, मलेशिया, घाना आणि मॉरिशस या देशातही हा खेळ खेळण्यास सुरुवात झाली आहे. महासंघाचे सचिव सुरेश गांधी व इतर पदाधिकारी या निमित्ताने जळगावी आले होते.

नियुक्तीनिमित्त सत्कार
जिल्हाधिकारी कार्यालयात या नियुक्तीनिमित्त खासदार रक्षा खडसे यांचा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय व संघाच्या विविध जिल्‘ांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.
-------
या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश व्हावा यासाठी आपण प्रयत्न करू. शालेय स्तरावर, क्रीडा मंत्रालय व अन्य मान्यतेसाठीही आपले प्रयत्न असतील.
- रक्षा खडसे, खासदार.

Web Title: Defense Khadse was elected president of Lambi Mahasangh for the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.