शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांचा दारुण पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 02:02 IST

कर्णधार व सलामीवीर मुरली विजय आणि वृद्धिंमान साहा यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दणदणीत विजय मिळविताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने धुव्वा उडविला.

विशाखापट्टणम : कर्णधार व सलामीवीर मुरली विजय आणि वृद्धिंमान साहा यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दणदणीत विजय मिळविताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने धुव्वा उडविला. मुंबईने दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना पंजाबने १७ व्या षटकातच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १२७ धावा फटकावल्या. विजयने नाबाद ५४ धावांची खेळी केली.डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १२४ अशी मर्यादित मजल मारली. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला पहिल्याच षटकात हाशिम आमलाच्या रूपाने पहिला धक्का देण्यात मुंबईकर यशस्वी ठरले. मात्र, यानंतर विजय व वृद्धिमान यांनी ११६ धावांची निर्णायक भागीदारी करून मुंबईचा पराभव स्पष्ट केला. वृद्धिमान ४० चेंडंूत ६ चौकार व एका षट्कारासह ५६ धावा काढून बाद झाला. मात्र, तोपर्यंत पंजाबचा विजय स्पष्ट झालेला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलही (०) झटपट बाद झाला. गुरकीरत मान सिंगने (नाबाद ६) विजयला साथ देताना संघाच्या विजयावर शिक्का मारला. विजयने कॅप्टन इनिंग्ज खेळताना ५२ चेंडूंत नाबाद ५४ धावा काढताना ५ चौकार व एक षट्कार ठोकला.तत्पूृवी, मार्कस स्टोइनीसच्या (४/१५) जोरावर पंजाबने मुंबईकरांना ९ बाद १२४ असे रोखून सामन्यावर वर्चस्व मिळविले. मुंबईकडून केरॉन पोलार्ड (२७) आणि नितीश राणा (२५) यांच्यामुळे मुंबईला शंभरचा पल्ला पार करण्यात यश आले. कर्णधार रोहित शर्मा (१५), उन्मुक्त चंद (०), अंबाती रायडू (०), जोस बटलर (९) असे प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने मुंबईकर अडचणीत आले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकमुंबई इंडियन्स : २० षटकांत ९ बाद १२४ धावा (केरॉन पोलार्ड २७, नितीश राणा २५; संदीप शर्मा २/११, मार्कस स्टोइनीस ४/१५, संदीप शर्मा २/११, मोहित शर्मा २/२६) पराभूत वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : १७ षटकांत ३ बाद १२७ धावा (वृद्धिमान साहा ५६, मुरली विजय नाबाद ५४; मिशेल मॅक्कलेनघन २/२४)