दीपिका, जोत्स्नाचे ऐतिहासिक सुवर्ण

By Admin | Updated: August 3, 2014 02:26 IST2014-08-03T02:26:18+5:302014-08-03T02:26:18+5:30

भारताच्या दीपिका पल्लिकल व जोत्स्ना चिनप्पाने 2क्व्या राष्टकुल स्पर्धेत स्क्वॉशच्या महिला दुहेरीमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.

Deepika, the historical gold of Jottsa | दीपिका, जोत्स्नाचे ऐतिहासिक सुवर्ण

दीपिका, जोत्स्नाचे ऐतिहासिक सुवर्ण

ग्लास्गो : भारताच्या दीपिका पल्लिकल व जोत्स्ना चिनप्पाने 2क्व्या राष्टकुल स्पर्धेत स्क्वॉशच्या महिला दुहेरीमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.  
जागतिक क्रमवारीत 1क्व्या क्रमांकावर असलेल्या दीपिका व 21व्या क्रमांकाच्या जोत्स्ना यांनी अंतिम लढतीत इंग्लंडच्या जेनी डनकाल्फ व लौरा मासारो यांचा सरळ दोन सेटमध्ये 11-6, 11-8 गुणांनी पराभव करून आपल्या देशाला राष्ट्रकुल स्पर्धेतील स्क्वॉशमधील पहिले सुवर्ण जिंकून दिले. 
या स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताला सुवर्णपदकाची प्रतीक्षा होती, ती दीपिका व जोत्स्नाने पूर्ण केली. या अंतिम लढतीकडे सर्वाचे लक्ष होते. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदकाने हुलकावणी दिली होती. 
(वृत्तसंस्था)
 
-दीपिका व जोत्स्ना जोडीने पहिला गेम शानदार खेळ करून 11-6 गुणांनी जिंकला. 
-दुस:या गेममध्ये डुनकांफ व मसारो जोडीने जोरदार खेळाचे प्रदर्शन करून 11-6 अशी आघाडी घेतली. नंतर भारतीय जोडीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून 7-7 अशी बरोबरी केली. त्यानंतर भारताच्या या जोडीने इंग्लंडच्या जोडीला कोणतीही संधी न देता सलग गुण मिळवित 1क्-7 अशी गुण संख्या केली. 
 
-इंग्लंड जोडीने पुन्हा चांगला खेळ  करून 8-1क् अशी मजल मारली. पण भारताच्या या सुंदर दिसणा:या जोडीने पुन्हा सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करून गेम हातातून जाऊ न देता 11-8 अशी मात करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.  

 

Web Title: Deepika, the historical gold of Jottsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.