दीपक सिंगचा ‘गोल्डन पंच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:26 IST2019-03-01T06:26:09+5:302019-03-01T06:26:12+5:30

मकरान चषक बॉक्सिंग; अंतिम फेरीतील पराभवामुळे पाच जणांचे रौप्यवर समाधान

Deepak Singh's 'Golden Punch' | दीपक सिंगचा ‘गोल्डन पंच’

दीपक सिंगचा ‘गोल्डन पंच’

नवी दिल्ली : राष्ट्रीय विजेता दीपक सिंग याने इराणच्या चाबहार येथे संपलेल्या मकरान कप बॉक्सिंग स्पर्धेच्या ४९ किलो गटात सुवर्ण पटकविले. त्अन्य पाच बॉक्सर अंतिम लढतीत पराभूत झाल्याने त्यांना रौप्यवर समाधान मानावे लागले. दीपकने बुधवारी रात्री निर्णायक लढतीत जाफर नसिरीवर मात केली.


अंतिम लढत गमावणाऱ्या अन्य खेळाडूंमध्ये पी. ललितप्रसाद (५२ किलो), राष्ट्रकुल रौप्य विजेता मनीष कौशिक(६०), दुर्योधनसिंग नेगी(६९ किलो), संजीत (९१) व राष्ट्रकुल रौप्य विजेता सतीश कुमार (९१ किलोहून अधिक) यांचा समावेश आहे.


राष्ट्रीय विजेत्या मनीषला डॅनियल शाह बक्श याने, तर सतीशला मोहम्मद मलियासने हरविले. संजीतला एल्डिन घोसोन याने नमविले. प्रसादला ओमिदा साफा अहमेदी व दुर्योधनला सज्जाद केजिमकडून मात मिळाली.

Web Title: Deepak Singh's 'Golden Punch'