दीपा कर्माकरने पटकावले अंतिम फेरीत स्थान; भारताला पदकाची आशा
By Admin | Updated: August 8, 2016 18:43 IST2016-08-08T07:00:01+5:302016-08-08T18:43:48+5:30
दीपा कर्माकरने जिम्नॅस्टिक्स वॉल्टमध्ये चोख कामगीरी करत अंतिम फेरीच्या पात्रता फेरीत ८ व्या क्रमांकावर राहत स्पर्धेतील आपले आव्हान जिंवत ठेवले आहे.

दीपा कर्माकरने पटकावले अंतिम फेरीत स्थान; भारताला पदकाची आशा
>ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ८ - रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिला दिवस भारतासाठी निराशाजनक गेला होता, आज दुसऱ्या दिवशी भारताच्या पदरी निराशाच आली. पण दीपा कर्माकरने जिम्नॅस्टिक्स वॉल्टमध्ये चोख कामगीरी करत अंतिम फेरीच्या पात्रता फेरीत ८ व्या क्रमांकावर राहत स्पर्धेतील आपले आव्हान जिंवत ठेवले आहे. जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला ठरली आहे. 14.850 गुणासह दीपाने ८ वे स्थान कायम ठेवले. ऑलिम्पिकच्या ५२ वर्षात भारतातर्फे जिम्नॅस्टिक्स सपर्धेत खेळणारी दीपा पहिली महिला खेळाडू आहे. जिम्नॅस्टिक्स महिला पात्रता फेरीतील सबडिव्हिजन 3 मध्ये उत्कृष्ठ प्रदर्षन करताना दीपाने १४.८५ गुण मिळवले.
दीपाने वॉल्टमधील कठीन असलेल्या प्रोदुनोवा उत्कृष्ठ रित्या करताना रिओ -16 मध्ये भारतातर्फे अंतिम फेरित पात्र ठरणारी पहिली खेळाडू ठरली आहे. पण दीपाची सर्व-सुमारे कामगिरीही सरासरीच राहिली. ३६ खेळाडूंमध्ये तिला २७ स्थान मिळवता आले तर तिचे एकूण गुण ५१.६६५ इतकं आहेत. दीपाने यापुढे उत्कृष्ठ कामगिरी केल्यास भारत पदकाचे खाते नक्कीच उघडेल.
दरम्यान, पहिल्या दिवशी हमखास पदकाची अपेक्षा असलेल्या जीतू रायने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात निराशा केली. जीतूने अंतिम फेरी गाठली मात्र तिथे त्याला 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. टेनिसमध्ये पदकाचे दुसरे आशास्थान असलेले लिएंडर पेस-रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे यांना पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला.