लढतीदरम्यान दुखापतग्रस्त महिला बॉक्सरचा मृत्यू
By Admin | Updated: October 29, 2014 02:15 IST2014-10-29T02:15:19+5:302014-10-29T02:15:19+5:30
दोन आठवडय़ांपूर्वी लढतीदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर कोमामध्ये असलेल्या महिला बॉक्सरचा अखेर मृत्यू झाला. क्रीडा मंत्रलयाने स्पष्ट केले

लढतीदरम्यान दुखापतग्रस्त महिला बॉक्सरचा मृत्यू
प्रिटोरिया : दोन आठवडय़ांपूर्वी लढतीदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर कोमामध्ये असलेल्या महिला बॉक्सरचा अखेर मृत्यू झाला. क्रीडा मंत्रलयाने स्पष्ट केले की, ‘फिंडिले मवेलासेचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला. देशामध्ये तीन दिवसांमध्ये तीन खेळाडूंचे निधन झाले.’
आफ्रिकेच्या क्रीडा मंत्रलयाने म्हटले की, ‘मव्हेलासेचा प्रिटोरियातील स्टिव्ह बाइको अॅकेडमिक रुग्णालयात मृत्यू झाला. 1क् ऑक्टोबर रोजी बॉक्सिंग लढतीदरम्यान मव्हेलासेला दुखापत झाली होती.’ येथे आलेल्या वृत्तानुसार मव्हेलासे 31 वर्षाची होती. शुक्रवारी कार अपघातामध्ये 8क्क् मीटरचा माजी विश्व चॅम्पियन व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मबुलेनी मुलादजीचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त रविवारी राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार व गोलकिपर सेंजो मेयिवा याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला.