CWG 2018: ओम मिथरवालला कांस्यपदक, भारताच्या पदकांची संख्या 22
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 10:33 IST2018-04-11T08:46:23+5:302018-04-11T10:33:21+5:30
ओम प्रकाश मिथरवाल याने पटकावलेल्या कांस्यपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता 22 झाली आहे.

CWG 2018: ओम मिथरवालला कांस्यपदक, भारताच्या पदकांची संख्या 22
गोल्ड कोस्ट : येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या ओम प्रकाश मिथरवाल यांने 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे. अखेरच्या क्षणात ओम मिथरवालची कामगिरी खालवाली त्यामुळं सुवर्णपदकाच्या शर्यतीत असलेला ओमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ओम प्रकाश मिथरवाल याने पटकावलेल्या कांस्यपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता 22 झाली आहे.
ओम मिथरवालने फायनलमध्ये 201.0 इतके गुण मिळवले. मात्र भारताचा स्टार नेमबाज जीतू रायला 8वे स्थान मिळाले. जीतू राय 50 मी. पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीतून बाहेर पडल्यामुळं भारताचं एक पदक हुकलं आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल रेपाचोलीने 227.2 गुण मिळवत गोल्ड मेडल मिळवले. मिथरवालचे हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने 9 एप्रिलला 10 मीटर एअर पिस्टोल प्रकारातही कांस्यपदक मिळवले होते.