पॅरा सायक्लिस्टची क्रूर थट्टा
By Admin | Updated: October 14, 2016 01:10 IST2016-10-14T01:10:50+5:302016-10-14T01:10:50+5:30
भारतीय पॅरा सायक्लिस्ट आदित्य मेहता याच्यासोबत विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याने क्रूर थट्टा केली. त्याला कृत्रिम अंग उतरविण्यास भाग पाडण्यात

पॅरा सायक्लिस्टची क्रूर थट्टा
बंगळुरू : भारतीय पॅरा सायक्लिस्ट आदित्य मेहता याच्यासोबत विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याने क्रूर थट्टा केली. त्याला कृत्रिम अंग उतरविण्यास भाग पाडण्यात आल्यामुळे या खेळाडूच्या जखमेतून रक्तदेखील वाहू लागले होते.
येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा गंभीर प्रकार घडला.
आदित्यसोबत दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अपमानजनक प्रकार घडला. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे पॅरा खेळाडूंसोबत होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीला वाचा फुटली आहे. हैदराबाद येथून फोनवर बोलताना मेहताने आपबिती सांगितली. तो म्हणाला, की सुरक्षा अधिकाऱ्याने मला कृत्रिम अंग काढायला भाग पाडले. काढलेले अंग परत घालायला ४५ मिनिटे लागतात, अशी वारंवार विनंती करीत राहिलो, पण कुणी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. कृत्रिम अंग परत घालत असताना अधिकारी लवकर रूमबाहेर येण्यास सांगत होते. या झटपटीत ओढूनताणून अंग घालत असताना जखम झाली. घरी परतल्यानंतर जखमेतून रक्तस्राव झाल्याचे दिसले. विमान उडण्याची वेळ होत असतानादेखील अधिकाऱ्यांनी माझी विनंती लक्षात घेतली नाही. याआधी मेहताला दिल्ली व बंगळुरु विमानतळावर अशाच वागणुकीचा सामना करावा लागला. सीआयएसएफ अधिकारी ठाकूर दास यांनी कृत्रिम अंग काढण्यास परावृत्त केले. जखम झाली आहे. अंग काढल्यानंतर ते पुन्हा घालण्यासाठी ४५ मिनिटे लागतील, असे मी त्यांना आधीच सांगितले, पण ते समजण्याच्या स्थितीत नव्हतेच, असे मेहताने सांगितले. (वृत्तसंस्था)