शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Cristiano Ronaldo, Instagram: 'इन्स्टाग्राम'च्या मैदानात रोनाल्डोचा विक्रमी GOAL! गाठला ५०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 20:16 IST

इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत रोनाल्डोच्या स्पर्धेत दुसरा कोणीही नाही.

Cristiano Ronaldo, Instagram 500 Million Followers: जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव निश्चितच घेतले जाते. जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये त्यांची गणना होते. रोनाल्डो मैदानावर असताना विरोधी संघाला त्याचा कायम धाक वाटत राहतो. रोनाल्डोने फुटबॉलच्या जगात जितके नाव कमावले आहे, तितकेच तो सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. अलीकडेच, सोशल मीडियावर रोनाल्डोच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम झाला आहे. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर रोनाल्डोचे ५०० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. इतके फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला व्यक्ती आहे.

रोनाल्डोने इंस्टाग्रामवर ५०० मिलियन फॉलोअर्स म्हणजेच ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. इंस्टाग्रामवर ५० कोटी फॉलोअर्स असलेला ख्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील पहिला क्रीडापटू ठरला आहे. इंस्टाग्रामशिवाय रोनाल्डोचे ट्विटवर १०.५ कोटी व फेसबूकवर १५.४ कोटी फॉलोअर्स आहेत. ख्रिस्टियानो रोनाल्डो इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी १९.७१ कोटी रूपये आकारतो. पण महत्त्वाची बाब म्हणजे, रोनाल्डो मात्र केवळ ५२३ लोकांनाच फॉलो करतो.

इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत रोनाल्डोच्या स्पर्धेत दुसरा कोणीही नाही. फुटबॉल जगतात त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी सजमला जाणारा अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी त्याच्यापासून खूप दूर आहे. मेस्सीचे ३७६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीही या बाबतीत रोनाल्डो आणि मेस्सीनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीचे इंस्टाग्रामवर २२४ मिलियन फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, रोनाल्डो आणि मेस्सी दोघेही सध्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाले आहे. हा दोघांचाही हा शेवटचा वर्ल्ड कप असेल असे बोलले जात आहे.

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलInstagramइन्स्टाग्रामVirat Kohliविराट कोहली