शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

IPL 2021 च्या प्रक्षेपणावर तालिबानची बंदी; चीअर लिडर्स अन् महिला प्रेक्षक हे महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 13:09 IST

IPL Broadcast Ban In Afghanistan : तालिबानच्या राजवटीखाली असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर घालण्यात आलीये बंदी.

ठळक मुद्देतालिबानच्या राजवटीखाली असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर घालण्यात आलीये बंदी.

आयपीएल २०२१ च्या (IPL २०२१) उर्वरित दुसऱ्या टप्प्याची सुरूवात रविवारपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) करण्यात आली. आता आयपीएलच्या सामन्यांदरम्यान ठराविक प्रमाणात प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात एकूण २९ सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. आता उर्वरित ३१ सामने दुबईमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण जग आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेत असताना मात्र अफगाणिस्तानमधील नागरिकांना आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेता येणार नाही. अफगाणिस्तानात आयपीएलच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तानात आयपीएलच्या सामन्यांवर बंदी घालण्यामागचं कारण त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला कायदा असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यात इस्लामला मान्य नसलेली दृष्य असल्याचं सांगत अफगाणिस्तानमध्ये आयपीएल २०२१ च्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे. मॅचच्या दरम्यान चिअरलीडर्सचा डान्स आणि स्टेडिअममध्ये महिलांच्या उपस्थिचीचं कारण देत अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  पहिल्या सामन्यात चेन्नईचा विजयआयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात रविवारी चेन्नई सुपरकिंग्जनं (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI) २० धावांनी विजय मिळवला. धोनी ब्रिगेडनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे. नाबाद ८८ धावांची खेळी करणारा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 

टॅग्स :IPLआयपीएल २०२१Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानDubaiदुबई