अ़ करीम उस्मान सय्यद यांचे हॉकीतील योगदान महत्त्वपूर्ण

By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:45+5:302014-08-28T20:55:45+5:30

जागतिक कीर्तीच्या हॉकीचे प्रणेते व भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून देणारे स्व़ मेजर ध्यानचंद यांच्यासोबत बिना आणि झाशी येथे दोन वेळा खेळण्याचा सन्मान प्राप्त केलेले सोलापूर जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष अब्दुल करीम उस्मान सय्यद यांचे सोलापूर जिल्हा हॉकीतील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आह़े 1959-60 साली रेल्वे संघाकडून त्यांनी ध्यानचंद यांच्यासोबत खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली आह़े त्यांनी 1959 साली भारतीय संघाविरुद्ध कंबाईन डिस्ट्रिक्टमध्ये हॉकी खेळात सहभाग नोंदवला होता़

The contribution of A Karim Usman Sayyad to India is important | अ़ करीम उस्मान सय्यद यांचे हॉकीतील योगदान महत्त्वपूर्ण

अ़ करीम उस्मान सय्यद यांचे हॉकीतील योगदान महत्त्वपूर्ण

गतिक कीर्तीच्या हॉकीचे प्रणेते व भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून देणारे स्व़ मेजर ध्यानचंद यांच्यासोबत बिना आणि झाशी येथे दोन वेळा खेळण्याचा सन्मान प्राप्त केलेले सोलापूर जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष अब्दुल करीम उस्मान सय्यद यांचे सोलापूर जिल्हा हॉकीतील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आह़े 1959-60 साली रेल्वे संघाकडून त्यांनी ध्यानचंद यांच्यासोबत खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली आह़े त्यांनी 1959 साली भारतीय संघाविरुद्ध कंबाईन डिस्ट्रिक्टमध्ये हॉकी खेळात सहभाग नोंदवला होता़
सोलापुरात गेल्या 50 वर्षांपासून हॉकीचा प्रसार आणि प्रचाराचा ध्यास घेतलेले अ़ करीम सय्यद राष्ट्रीय प्रशिक्षक किसनलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले असून, त्यांनी आतापर्यंत 15 राष्ट्रीय खेळाडूंसह अनेक विद्यापीठ खेळाडू घडविले आहेत़
त्यांचे वडील उस्मानदेखील एक नावाजलेले क्रिकेटपटू़ त्यांच्याबरोबर मैदानात रोज जाताना त्यांनादेखील खेळाची आवड निर्माण झाली़ तेथूनच ते पुढे हॉकीकडे वळल़े ते शाळेत हॉकीसोबत फुटबॉल व क्रिकेटदेखील खेळत़ हॉकीची गोडी लागल्याने त्यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केल़े संगमेश्वर कॉलेजमध्ये कोच म्हणून 1966 पासून ते कार्यरत झाल़े त्यांनी संघाला हॅट्ट्रिकही मिळवून दिली़ हॉकीतील उल्लेखनीय कामगिरीमुळे 1956 मध्ये विजापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली़ सोलापूर रेल्वेकडून खेळताना त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या़ पंधरा वर्षे रेल्वे तसेच रेल्वे इन्स्टिट्यूट संघाचे कर्णधारपद त्यांनी भूषविल़े त्यांना 1962 ते 1965 दरम्यान किसनलाल यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल़े याचा फायदा घेत त्यांनी सोलापुरातून संगमेश्वर, दयानंद, वैद्यकीय कॉलेज, सेंट जोसेफ, पानगल, यलगुलवार प्रशाला, स्वामी विवेकानंद, महापालिका शाळेतील खेळाडूंना हॉकीचे प्रशिक्षण दिल़े त्यावेळी र्शीकृष्ण अय्यर, राजू कावळे, अनिल नातू, दिलीप गव्हाणे, मतीन शेख, जरार कुरेशी आदी दज्रेदार विद्यापीठ खेळाडू त्यांनी घडविल़े उदय पवार, आत्मचरण, अशपाक शेख, अमीर शेख, आसिफ शेख, भागवत, रहेमान शेख तसेच मुलींमध्ये कल्पना होटकर, वैशाली मोतेकर, रार्जशी लोकेकर यांच्यासारख्या महिला राष्ट्रीय खेळाडूंनी स्पर्धा गाजवल्या़
कोट????-
खेळाडू शारीरिक तंदुरुस्तीमध्ये कमी पडतात़ खेळाडूंनी वर्षभर सराव केला पाहिज़े सरावानंतर सकस आहार घेणे गरजेचे आह़े सरावाबरोबरच स्पर्धेतही आत्मविश्वासाने खेळले पाहिज़े त्यामुळे कामगिरीत सुधारणा होण्यास मदत होईल़ स्पर्धेत भाग घेतल्याशिवाय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढत नाही़
00000000000000000000000000

Web Title: The contribution of A Karim Usman Sayyad to India is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.