शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष- भारतीय क्रीडा विकासात क्रिकेटचे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 09:36 IST

भारतात क्रिकेटची वाढती लोकप्रियता नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे. विशेषत: अन्य खेळांचे पाठीराखे आणि पदाधिकारी नेहमीच क्रिकेटच्या तुलनेत भेदभाव होत असल्याचा आरोप करतात.

भारतात क्रिकेटची वाढती लोकप्रियता नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे. विशेषत: अन्य खेळांचे पाठीराखे आणि पदाधिकारी नेहमीच क्रिकेटच्या तुलनेत भेदभाव होत असल्याचा आरोप करतात. तरीही सभ्य माणसाच्या या खेळाने देशाच्या क्रीडा विकासात मोठी भूमिका बजावली, ही बाब मान्य करावीच लागेल. १९८३ च्या विश्वचषकात भारतीय संघ चॅम्पियन बनल्यापासून खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. काळानुसार  अन्य खेळाडूंनाही  ‘स्टारडम’ मिळू लागले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल बीसीसीआयने नीरज चोप्राला एक कोटीचा पुरस्कार दिला. भारताच्या क्रीडाविश्वात हे वगळे उदाहरण ठरावे. क्रिकेटची वाढती लोकप्रियता अन्य खेळाच्या विकासास कशी पूरक ठरली, हे जाणून घेऊ या...

विदेशी कोचेस

क्रिकेटसारख्या अन्य खेळामध्ये आता विदेशी कोचेसची सेवा घेण्याची वृत्ती वाढली. याचे चांगले निकाल पुढे आले आहेत. गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात भारताने २०११ चा वन डे विश्वचषक जिंकला, त्याचप्रमाणे ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने जर्मनीचे कोच क्लॉज बार्टिनेत्झ यांच्या मार्गदर्शनात टोकियोत सुवर्ण जिंकले. पी. व्ही. सिंधूने द. कोरियाचे कोच ताई सॅंग यांच्या मार्गदर्शनात कांस्य पदक जिंकून सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्याची किमया साधली. पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांनंतर कांस्यपदक विजेती कामगिरी केली ती देखील ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रीड यांच्याच मार्गदर्शनात.

प्रायोजकांचीही रुची वाढली

क्रिकेटशिवाय अन्य खेळांमध्ये आता प्रायोजक रुची दाखवू लागले आहेत. याचे उत्तम उदाहरण प्रो लीग कबड्डीचे देता येईल. कबड्डी टीव्हीवरून घरोघरी पोहोचली.

व्यावसायिक दृष्टिकोन

क्रिकेटसारखाच बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल, मुष्टियुद्ध आदी खेळात आता व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्यात येत आहे. हा वेग मंद असला तरी उशिरा का होईना मात्र अन्य खेळावर याचा सकारात्मक परिणाम जाणवतो.

क्रीडाशक्तीच्या उंबरठ्यावर

आंतरराष्ट्रीय पटलावर खेळांना मिळणारे यश हे देशाच्या प्रगतीचे प्रतीक मानले जाते. मागच्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताला क्रीडाशक्तीच्या रूपाने ओळख लाभत आहे.

लहान शहरातील मोठे खेळाडू

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला. धोनी हा रांचीसारख्या लहान शहरातून उदयास आला. धोनीला आदर्श मानून लहान लहान शहरातून खेळाडू पुढे येऊ लागले. भारतीय महिला हॉकी संघ याचे मोठे उदाहरण आहे. ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरीच्या बळावर हॉकी विश्वाला चकित करणाऱ्या महिला हॉकी संघातील अनेक खेळाडू, लहान शहरातील आणि गरीब-मागासलेल्या कुटुंबातून पुढे आल्या आहेत.

आर्थिक स्थिती सुधारली

क्रिकेटपटूंच्या तुलनेत अन्य खेळातील खेळाडूंच्या आर्थिक स्थितीत हवी तशी सुधारणा अद्याप झालेली नाही, ही सत्यता आहे. तथापि, मागील दशकापासून यात उल्लेखनीय सुधारणा घडून आली. आयपीएलच्या धर्तीवर आयोजित आयएसएल फुटबॉल, पीबीएल बॅडमिंटन, कुस्तीची प्रो रेसलिंग लीग आणि प्रो कबड्डी लीग यापासून खेळाडूंना फार मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Indiaभारत