भारतीय फुटबॉल संघावर अभिनंदनाचा वर्षाव

By Admin | Updated: May 21, 2017 01:21 IST2017-05-21T01:21:41+5:302017-05-21T01:21:41+5:30

१७ वर्षांखालील भारतीय संघाने इटलीविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना २-० ने जिंकला. त्यानंतर एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, क्रीडामंत्री

Congratulations on Indian football team | भारतीय फुटबॉल संघावर अभिनंदनाचा वर्षाव

भारतीय फुटबॉल संघावर अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली : १७ वर्षांखालील भारतीय संघाने इटलीविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना २-० ने जिंकला. त्यानंतर एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, क्रीडामंत्री विजय गोयल यांच्यासह अनेक दिग्गजांनी भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
यातील अनेकांनी भारतीय युवा संघावर टिष्ट्वटरवर अभिनंदनाचा वर्षाव केला. एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘‘प्रारंभी १०० च्या क्लबमधील समावेश आणि आता भारतीय अंडर १७ संघाने इटलीच्या १७ वर्षांखालील संघाला नमवले.’’ गोयल यांनी लिहिले, ‘‘अद्भुत दिवस. भारतीय अंडर १७ फुटबॉल संघाने इटलीला २-० ने पराभूत केले. सुरेख कामगिरी. तुमचा अभिमान आहे.’’
फुटबॉलचा चाहता व अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला, ‘‘आमच्या अंडर १७ फुटबॉल संघाचे अभिनंदन. आम्ही इटलीला २-० गोलने नमवले. भविष्य उज्ज्वल आहे.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Congratulations on Indian football team