जेतेपदासाठी झुंज
By Admin | Updated: June 7, 2014 03:09 IST2014-06-07T00:50:09+5:302014-06-07T03:09:21+5:30
फ्रेंच ओपनमध्ये स्पेनचा राफेल नदाल व सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात पुरुष एकेरीतील जेतेपदासाठी अंतिम लढत रंगेल.

जेतेपदासाठी झुंज
>पॅरिस : फ्रेंच ओपनमध्ये स्पेनचा राफेल नदाल व सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात पुरुष एकेरीतील जेतेपदासाठी अंतिम लढत रंगेल.
शुक्रवारी खेळल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दुस:या मानांकित जोकोव्हिचने लातिव्हियाचा ‘जायंटकिलर’ अर्नेस्ट्स गुलबिसचा 6-3, 6-3, 3-6, 6-3 ने पराभव केला, तर नदालने सातव्या मानांकित ब्रिटनच्या अॅण्डी मरेवर 6-2, 6-3, 6-1 ने सहज मात केली. जोकोव्हिच ग्रॅण्डस्लॅम टेनिस कारकीर्दीत 13 व्यांदा तर फ्रेंच ओपनमध्ये दुस:यांदा अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. जोकोव्हिचला अंतिम फेरीत फ्रेंच ओपनमध्ये आठवेळा जेतेपदाचा मान मिळविणा:या नदालच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. नदालने 2क्12 मध्ये अंतिम लढतीत जोकोव्हिचचा पराभव केला होता.
मारियासमोर नवख्या सिमोनाचे आव्हान
महिला एकेरीत शनिवारी मरिया शारापोव्हा आणि सिमोना हॅलेप यांच्यात फायनल टशन रंगेल. या लढतीत मरिया फे व्हरिट वाटत असली तरी हॅलेप तिला तगडे आव्हान देईल.
यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन मी आजच्या लढती केले. येथे दहा वर्षात नऊ वेळा अंतिम लढतीत खेळणो, याचा मी कधीच विचार केला नव्हता.
- राफेल नदाल
येथील गरम वातावरणाने दोन्ही खेळाडूंना दमवले. अशा परिस्थितीत मी सर्वतोपरी प्रय} करत होतो, परंतु निकाल काय लागेल हे मलाच माहित नव्हते.
- नोवाक जोकोव्हिच