सोशल मीडियावरुन शोभा डें वर टीकेचा भडीमार

By Admin | Updated: August 9, 2016 14:10 IST2016-08-09T13:27:46+5:302016-08-09T14:10:16+5:30

भारतीय खेळाडूंचा आपल्या टिवटमधून अपमान करणा-या लेखिका शोभा डे यांना सोशल मिडियावर नेटीझन्सनी शब्दांनी चांगलेच झोडपून काढले आहे.

A complaint against social media has been criticized | सोशल मीडियावरुन शोभा डें वर टीकेचा भडीमार

सोशल मीडियावरुन शोभा डें वर टीकेचा भडीमार

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - रिओला गेलेल्या भारतीय खेळाडूंचा आपल्या टि्वटमधून  अपमान करणा-या लेखिका शोभा डे यांना सोशल मिडियावर नेटीझन्सनी शब्दांनी चांगलेच झोडपून काढले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे घटस्फोट घेण्याइतके सोपे नसते असे काही टि्वटर युझर्सनी शोभा डे यांना सुनावले आहे. 
 
रिओला जा, सेल्फी काढा, रिकाम्या हाताने परत या, हा सर्व पैशांचा अपव्यय आहे या वादग्रस्त टि्वटमधून शोभा डे यांनी आपल्या अपूर्ण ज्ञानाची प्रचिती दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी खेळाडू काय कष्ट घेतात, किती वर्ष मेहनत घेतात याची डे यांना जराही कल्पना नाही.  
 

Web Title: A complaint against social media has been criticized