कॉमनवेल्थच्या व्हिडीयोमध्ये भारतीय तिरंगा धरला उलटा
By Admin | Updated: July 24, 2014 18:07 IST2014-07-24T18:07:56+5:302014-07-24T18:07:56+5:30
येथे कॉमनवेल्थ गेम्सना धडाक्यात सुरूवात झाली असली तरी स्पर्धेच्या अधिकृत व्हिडीयोमध्ये भारताचा राष्ट्रध्वज उलटा धरल्याचे समोर आल्याने सोशल मीडियावर टीका व्यक्त होत आहे.

कॉमनवेल्थच्या व्हिडीयोमध्ये भारतीय तिरंगा धरला उलटा
ऑनलाइन टीम
ग्लास्गो (स्कॉटलंड), दि. २४ - येथे कॉमनवेल्थ गेम्सना धडाक्यात सुरूवात झाली असली तरी स्पर्धेच्या अधिकृत व्हिडीयोमध्ये भारताचा राष्ट्रध्वज उलटा धरल्याचे समोर आल्याने सोशल मीडियावर टीका व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया या लोकप्रिय कार्यक्रमातही हीच चूक केल्याचे दाखवून देण्यात आले आहे.
भारताच्या ध्वजामध्ये भगवा रंग वरच्या बाजुला असून हिरवा रंग खालच्या बाजुला असतो आणि राष्ट्रीय ध्वज प्रमाणानुसार तो उलटा दाखवता कामा नये. यापूर्वीही असे प्रकार घडल्याचे अनेकवेळा समोर आले असून संबंधितांचं अज्ञान व राष्ट्रध्वजाबाबतचा अनादर व अनास्था दिसून आलेली आहे. या अपमानाची चांगलीच चर्चा सोशल मीडिया साईटवर झडत असून हा प्रकार नक्की का व कसा घडला याचा तपशील उपलब्ध व्हायचा आहे.