शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

Commonwealth Games 2022 : स्पर्धेसाठी 'कार' विकणाऱ्या सुशीला देवीने घडविला इतिहास, ज्युदोत जिंकले रौप्यपदक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 22:14 IST

Commonwealth Games 2022 Shushila Devi Likmabam Judo : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत असताना ज्युदोतही ( Jodo) अनपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली.

Commonwealth Games 2022 Shushila Devi Likmabam Judo : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत असताना ज्युदोतही ( Judo) अनपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली. २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या २७ वर्षीय सुशीला देवी लिकमाबामने ४८ किलो वजनी गटात भारतासाठी आणखी एक पदक मिळवून दिले. सुशीलाने उपांत्य फेरीत मॉरिशियसच्या प्रिस्किला मोरँडावर विजय मिळवून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. अंतिम फेरीत सुशीलासमोर  दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबू हिचे आव्हान होते. आफ्रिकन खेळाडू वरचढ ठरली आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

इम्फाल येथे एका सामान्य कुटुंबातिली सुशीला देवीचा जन्म... काका लिकमाबाम दिनित हे आतंररष्ट्रीय ज्युदोपटू असल्याने सुशीलाही या खेळाकडे आकर्षित झाली आणि तिने पदकांची कमाई केली. २०१४ च्या राष्ट्रकुल रौप्यपदकासह तिच्या नावावर दोन आशियाई खुल्या अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदकंही आहेत. २०१८मध्ये तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पहिले रौप्य जिंकले आणि तिला मणिपूर पोलिसांत  नोकरी मिळाली. २०१९ मध्ये तिने याच स्पर्धेत आणखी एक रौप्यपदक जिंकले. त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.  टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती भारताची एकमेव ज्युदोपटू होती. 

CWG 2022मध्ये सुशीला व्यतिरिक्त विजय कुमार यादव ( ६० किलो), जसलीन सिंग सैनी ( ६६ किलो) व सुचिका तरियाल ( ५७ किलो महिला गट) हे कांस्यपदकाच्या शर्यतीत होते. विजय कुमारने ६० किलो वजनी गटाच्या लढतीत सायप्रसच्या पेट्रोसवर विजय मिळवून कांस्य निश्चित केले.  भारताची एकूण पदकसंख्या ८ झाली आहे.   

सुशीलाचा प्रेरणादायी प्रवास...ज्युदो फेडरेशन केवळ जागतिक व आशियाई स्पर्धेकरीता खेळाडूंचा खर्च उचलतात, परंतु या स्पर्धांसाठीच्या पात्रता स्पर्धेसाठी खेळाडूंना आपापला खर्च उचलावा लागलो. सुशीलाने अशाच एका सर्धेसाठी कर्ज काढले आणि स्वतःजवळील कारही विकली होती. हा ऑलिम्पिक खेळ नसल्याने प्रायोजकही यात गुंतवणूक करत नाहीत.  कोरोनामुळे सुशीलाच्या सरावाला ब्रेक लागला होता. मात्र, तिने घरातच ज्युदोसाठी सेट अप उभा केला.. तिने प्रशिक्षकांकडून जुना मॅट उसना घेतला आणि सराव केला.   

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ