शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

४ वर्षांपूर्वी पान विकणाऱ्या पोरानं पटकावलं रौप्य; जाणून घ्या मराठमोठ्या संकेत महादेव सरगरची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 16:45 IST

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचे खाते उघडले आहे.

बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पदकाचे खाते उघडले आहे. शनिवारी मराठमोळ्या संकेत महादेव सरगरने (Sanket Mahadev Sargar) रौप्य पदक जिंकून भारताला पहिले राष्ट्रकुल पदक मिळवून दिले. संकेतने वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver Medal) पटकावले. संकेतने मिळवलेल्या या पदकापूर्वी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये १२५ पदकांची कमाई केली होती आणि नेमबाजीनंतर ही सर्वोत्तम संख्या ठरली आहे. शेवटच्या प्रयत्नापर्यंत संकेत आघाडीवर होता मात्र कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला १३९ वजन उचलता आलं नाही. १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक पटकावले आणि संकेतला रौप्यवर समाधान मानावे लागले. 

दरम्यान, मलेशियाच्या बिन कसदम मोहम्मदने एकूण २४८ किलो वजन उचलून सुवर्ण पदकावर नाव कोरले. २१ वर्षीय संकेत महाराष्ट्रातीलसांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने नुकतेच सिंगापूर इंटरनॅशनलमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तो सीनियर कॉमनवेल्थ गेम्स २०२१ मध्ये सुवर्ण जिंकून राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरला.  

मराठमोळ्या संकेतने रचला इतिहासमराठमोळा २१ वर्षीय संकेत २०२० मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा चॅम्पियन राहिला आहे. त्याच्या नावावर ५५ किलो वर्गात (स्नॅच १०८ किलो, क्लीन अँड जर्क (१३९ किलो) राष्ट्रीय विक्रमाची नोंद आहे. संकेत सरगरची ऑक्टोबर महिन्यात NIS पटियाला येथे प्रशिक्षण घेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. संकेतला वेटलिफ्टिंगचा मजबूत वारसा लाभलेला आहे, २१ वर्षीय संकेत हा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात इतिहासाचा विद्यार्थी आहे. तो खेलो इंडिया युथ गेम्स २०२० आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० चा चॅम्पियन होता. विशेष म्हणजे या आठवड्यात तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देखील पदार्पण करणार आहे.

संकेतची संघर्षमय कहाणीसंकेतचे वडील महादेव सरगर हे १९९० च्या कालावधीत सुरुवातीला ग्रामीण भागातून सांगलीत आले होते. त्यांनी उदरनिर्वाहासाठी प्रथम पान शॉप, संकेत पान आणि नंतर त्याच्या शेजारी चहा आणि नाश्त्याचा स्टॉल उघडण्यासाठी एका गाडीतून फळे देखील विकण्याचा छोटा व्यवसाय केला. संकेत म्हणतो की, त्याने खेळ सुरू केल्यानंतर काही वर्षांनी त्याने या खेळाला अधिक गांभीर्याने घेण्यास सुरूवात केली. "सुरूवातीच्या पहिल्या दोन वर्षी मला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची देखील माहिती नव्हते त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा मी विचारही करत नव्हतो. मला जिल्हा पातळीवरील स्पर्धांची तयारी कशी करावी हे आव्हान सतावत होते. मी त्याच्यासाठी खास प्रशिक्षम न घेता माझे प्रयत्न चालू ठेवले. मी इयत्ता ९ वीत जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता आणि तेव्हा कोणतेही प्रशिक्षण न घेता मी आज रौप्य जिंकले आहे", असे संकेतने सांगितले. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतSangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रSilverचांदी