शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2022 : सुवर्ण, रौप्यपाठोपाठ कांस्यही आले! अवघ्या काही मिनिटांत संदीप कुमारने भारताला विक्रमी पदक जिंकून दिले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 17:01 IST

Commonwealth Games 2022 men's 10000m Race Walk : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले. महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली.

Commonwealth Games 2022 men's 10000m Race Walk : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले. महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली. त्यापाठोपाठ अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर  अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. तिहेरी उडीत कांस्यपदकाने हुलकावणी दिली असली तरी पुरुषांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारने ( Sandeep Kumar) सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करून कांस्यपदक जिंकले. प्रियांका गोस्वामीने महिलांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत काल रौप्यपदकाची कमाई केली होती. 

#Men's 10,000m Race Walk - Final भारताच्या प्रियांका गोस्वामीने शनिवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने ४३ मिनिटे ३८.८३ सेकंदाची वेळ नोंदवताना हे पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली होता. आज पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीप कुमार ( Sandeep Kumar) याने पहिले १००० मीटरचे अंतर ३ मिनिटे ४९.२९ सेकंदात पार करून आघाडी घेतली होती. दुसऱ्या व तिसऱ्या स्प्लिटमध्ये कॅनडा व केनियाच्या खेळाडूंनी आघाडी घेतली, परंतु ४००० मीटरनंतर पुन्हा संदीप आघाडीवर आला. 

संदीपने २०१५च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलोमीटर शर्यतीत सहभाग घेतला होता. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तो ३५ वा आला होता. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने २० किलोमीटर शर्यतीत २३वे स्थान पटकावले होते. सध्या ५० किमी व २० किमी चालण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहेत. संदीपने आघाडी कायम राखताना पदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले होते. ५००० मीटरनंतरही तो १९:२३.५३ सेंकदासह आघाडीवर होता.

ऑस्ट्रेलियाच्या डेक्लॅन टिंगेने ६००० मीटरनंतर आघाडी घेतली आणि अन्य स्पर्धक व त्याच्यात मोठा गॅप प्रकर्षाने दिसत होता. संदीप दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु केनियन खेळाडूचे त्याच्या कडवे आव्हान होते. ७००० मीटरनंतरही ऑसी खेळाडूची आघाडी कायम होती. पण, भारतीय खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर सरकला. त्याने तिसरे स्थान कायम राखताना कांस्यपदक जिंकले. संदीपने 38:49.21 मिनिटे अशी वेळ नोंदवली. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ