शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Commonwealth Games 2022: सुवर्ण सिंधू!; पी व्ही सिंधूने अखेर रौप्यपदकाची भिंत ओलांडली, भारतासाठी ऐतिहासिक पदकाची कमाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 2:45 PM

Commonwealth Games 2022 PV Sindhu Gold :  ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही  सिंधूने (  P V Sindhu) अखेर सुवर्णपदक व तिच्यामध्ये असलेली भिंत ओलांडली

Commonwealth Games 2022 PV Sindhu Gold :  ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही  सिंधूने (  P V Sindhu) अखेर सुवर्णपदक व तिच्यामध्ये असलेली भिंत ओलांडली. तिला २०१४ व २०१८मध्ये महिला एकेरीच्या सुवर्णपदकाने सिंधूला हुलकावणी दिली होती. पण, २०२२मध्ये तिने अखेर पहिले सुवर्णपदक जिंकले. सायना नेहवालने २०१० व २०१८मध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर महिला एकेरीत सुवर्ण जिंकणारी सिंधू ही दुसरी भारतीय महिला बॅडमिंटपटू ठरली.  सिंधूच्या या विजयाने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १९ झाली असून पदक तालिकेत आपण न्यूझीलंडला मागे सोडून चौथ्या क्रमांकावर सरकलो आहोत.

सिंगापूर व मलेशियन बॅडमिंटनपटूंना पराभूत करून सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे तिचे जिंकणे निश्चित मानले जातच होते. कॅनडाच्या मिशेल ली हिचा तिने मागील ६ सामन्यांत पराभव केला होता. सिंधूने नेट नजिकचा खेळ करताना गुण घेण्याचा डाव रचला आणि ३-१ अशी आघाडीमुळे तो यशस्वीही ठरताना दिसला. मिशेलला कोर्टवर सिंधूने व्यग्र ठेवले. सुरुवातीचा फटका मागे मारल्यानंतर दुसरा फटका नेट जवळ खेळून सिंधूने गुणसंख्या वाढती ठेवली. मिशेलने हळुहळू सामन्यात कमबॅक करण्यास सुरुवात केली आणि गेममध्ये ४-४ अशी बरोबरी घेतली. सिंधूचा डाऊन दी लाईन स्मॅश पाहण्यासारखा होता. सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली.

ब्रेकनंतर दोन्ही खेळाडूंचा खेळ उंचावलेला दिसला. दोघींमध्ये ३० फटक्यांची रॅली पाहताना चाहते सुखावले होते आणि सिंधूने ती रॅली जिंकून १५-९ अशी आघाडी वाढवली होती. सिंधूच्या प्रहारासमोर कॅनेडीयन खेळाडू कोर्टवर कोसळलेली दिसली. सिंधूने बॉडीलाईन स्मॅश मारत तिला हतबल केले. सिंधूने २१-१५ असा पहिला गेम घेतला. ( PV Sindhu takes the 1st game 21-15  ). मिशेलने दुसऱ्या गेममध्ये आक्रमक सुरुवात करताना गुण घेतले. सिंधूने यावेळेस चतुराई दाखवली अन् मिशेलच्या आक्रमणाला बचावात्मक खेळाने उत्तर देत चूका करण्यास भाग पाडले. मिशेलकडून चूका होत गेल्या अन् सिंधूने ११-५ अशी आघाडी घेतली. 

सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या प्रत्येक फटक्याला प्रत्युत्तर दिले आणि जबरदस्त चाललेल्या रॅलीत पुन्हा कॅनेडीयन खेळाडूला कोर्टवर लोटांगण घालायला लावले. दोघींमध्ये रॅलीचा सुरेख खेळ पाहायला मिळाला. सिंधूकडे १३-९ अशी होती. २३व्या गुणासाठी दोन्ही खेळाडूंमध्ये ५०+शॉट्सची रॅली रंगली अन् ती मिशेलने जिंकली. सिंधू थकलेली पाहायला मिळत होती आणि त्यामुळे भारतीय चाहत्यांची धाकधुक वाढली होती. सिंधूकडे १६-१२ अशी आघाडी होती, पण मिशेलच्या खेळाचा स्थर उंचावत चालला होता. सिंधूने दुसरा गेम २१-१३ असा जिंकून सुवर्णपदक नावावर केले. डबल ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत २०१८मध्ये मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८मध्ये तिला महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०१४मध्ये तिने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. २०२२मध्ये तिला मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक कायम राखता आले नाही आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

#Badminton भारताने बॅडमिंटनमध्ये सिंधूचं पदक वगळता १ रौप्य व दोन कांस्यपदकांची  कमाई केली आहे. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीने कांस्यपदकाच्या लढाईत सिंगापूरच्या जिआ हेंग तेहचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. महिला दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जॉली त्रिसा व गायत्री गोपिचंद यांनी ऑस्ट्रेलियन जोडीचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. मिश्र सांघिक गटात भारताला सुवर्णपदकाच्या सामन्यात मलेशियाकडून १-३  असा पराभव पत्करावा लागला. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton