Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना टळली, कुस्तीच्या लढतींदरम्यान खेळाडू बालंबाल बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 20:07 IST2022-08-05T20:06:57+5:302022-08-05T20:07:56+5:30
Commonwealth Games 2022: आज राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान एक अशी घटना घडली, ज्याचीच अधिक चर्चा सुरू आहे. दीपक पुनियाचा सामना संपल्यानंतर रेसलिंग हॉलमधील स्पीकर छतावरून खाली कोसळला.

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना टळली, कुस्तीच्या लढतींदरम्यान खेळाडू बालंबाल बचावले
मँचेस्टर - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि दीपक पूनिया यांनी विजय मिळवत आगेकूच केली आहे. मात्र आज राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान एक अशी घटना घडली, ज्याचीच अधिक चर्चा सुरू आहे. दीपक पुनियाचा सामना संपल्यानंतर रेसलिंग हॉलमधील स्पीकर छतावरून खाली कोसळला.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजकांसाठी एक लाजीरवाणी घटना घडली आहे. स्टेडियमच्या छतावरून स्पीकर खाली पडल्याने पहिल्या सत्राला सुरुवात झाल्यावर काही मिनिटांमध्येच कुस्तीचे सामने थांबवण्यात आले. तसेच प्रेक्षकांना हॉलमधून बाहेर पडण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी केवळ कुस्तीचे केवळ पाचच सामने पूर्ण झाले होते. तेवढ्यात कुस्तीच्या मॅट चेअरमनच्या जवळ पडला. त्यामुळे त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा प्रकार भारताचा कुस्तीपटू दीपक पूनिया याचा सामना संपल्यानंतर त्वरित घडला. पूनियाने ८६ किलो वजनी गटात पहिला सामना जिंकला. तिथे जमलेल्या प्रेक्षकांना जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले. आयोजकांनी संपूर्ण तपास करण्यास सांगितले आहे. एका कोचने सांगितले की, आम्ही सर्व सुरक्षित आहोत. कुठलाही अनूचित प्रकार टाळण्यासाठी पूर्णपणे तपास सुरू आहे.