शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
3
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
4
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
5
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
7
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
8
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
9
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
10
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
11
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
12
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
13
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
15
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
16
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
17
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
18
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
19
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
20
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

Commonwealth Games 2022 : ०.७३ सेकंदाच्या फरकाने हुकलं पदक; हिमा दास, द्युती चंद या जीव तोडून धावल्या, पण... Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 5:56 PM

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी बॉक्सर्सनी सुवर्ण'पंच'लगावला. नितू व अमित पांघल यांनी सुवर्णपदक पटकावल्यानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस पडला.

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी बॉक्सर्सनी सुवर्ण'पंच'लगावला. नितू व अमित पांघल यांनी सुवर्णपदक पटकावल्यानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस पडला. पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. पुरुषांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारने ( Sandeep Kumar) सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करून कांस्यपदक जिंकले. त्यात महिलांच्या भालाफेकीत अन्नू राणीने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर ४ बाय ४०० मीटर रिलेच्या अंतिम फेरीत हिमा दास व दृती चंद यांच्या टीमवर लक्ष होते. #Women's Javelin Throw महिलांच्या भालाफेकीत उत्तरप्रदेशच्या अन्नू राणीने कांस्यपदकाची कमाई केली. तिने चौथ्या प्रयत्नात ६० मीटर फेकलेला भाला हा पदकासाठी पुरेसा ठरला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या ( २०१९ दोहा) अंतिम फेरीत पात्र ठरणारी ती भारताची पहिली महिला भालाफेकपटू ठरली होती. 

#Men's 10,000m Race Walk Final पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीप कुमार ( Sandeep Kumar) याने  38:49.21 मिनिटे अशी वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले.

#Triple Jump  अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. पॉलने १७.०३ मीटर, तर अब्दुल्लाने १७.०२ मीटर लांब तिहेरी उडी मारली.  

#Women's 4 x 100m Relay फायनलमध्ये दृती चंद, हिमा दास, सराबनी नंदा व ज्योती याराजी यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. पण, शर्थीचे प्रयत्न करूनही या संघाला ४३.८१ सेकंदाच्या वेळेसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नायजेरियाने ४२.१० सेकंदासह सुवर्ण, इंग्लंडने ४२.४१ सेकंदासह रौप्य व जमैकाने ४३.०८ सेकंदासह कांस्यपदक जिंकले.

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाHima Dasहिमा दासDutee Chandद्युती चंद