Commonwealth Games 2022 : हरमनप्रीत सिंगची हॅटट्रिक; भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, वेल्सवर ४-१ असा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 08:11 PM2022-08-04T20:11:49+5:302022-08-04T20:18:12+5:30

Commonwealth Games 2022 Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दुसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Commonwealth Games 2022 Hockey : Hat-trick by Harmanpreet Singh, 1 goal from Gujant Singh, Indian men's hockey team beat Wales and enter into Semi Finals  | Commonwealth Games 2022 : हरमनप्रीत सिंगची हॅटट्रिक; भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, वेल्सवर ४-१ असा विजय

Commonwealth Games 2022 : हरमनप्रीत सिंगची हॅटट्रिक; भारतीय पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक, वेल्सवर ४-१ असा विजय

googlenewsNext

Commonwealth Games 2022 Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दुसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने ४-१अशा फरकाने वेल्सवर विजय मिळवला. हरमनप्रीत सिंगने ३ गोल केले. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कॅनडाचा ८-० असा धुव्वा उडवला होता. आजच्या विजयानंतर ब गटातून १० गुणांसह भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुरूष संघाला २०१० व २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकता आले होते. इंग्लंडला भारताकडून गटाचे अव्वल स्थान हिसकावण्यासाठी कॅनडावर १४-१५ गोल्सने विजय मिळवावा लागेल.

#Hockey टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. ब गटात ७ गुणांसह भारतीय संघ आघाडीवर असला तरी उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना आज वेल्सवर विजय मिळवणे गरजेचा होता. पहिल्या १५ मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांकडून डिफेन्सिव्ह खेळ झालेला पाहायला मिळाला. ललित कुमार उपाध्याय याने ८व्या मिनिटाला मैदानी गोल करण्याचा प्रयत्न अडवण्यात आला. पुढच्याच मिनिटाला वरुण कुमारचा पेनल्टी कॉर्नर वेल्सच्या गोलक्षकाने रोखला. पहिल्या क्वार्टरमध्ये गोलशून्य बरोबरी राहिली. 

१८व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगचा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याचा प्रयत्न वेल्सच्या गोलीने अडवला. पण, पुढच्या एका मिनिटात हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर सलग दोन गोल करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. वेल्सकडून त्यानंतर आक्रमक खेळ होताना दिसला अन् ते सातत्याने चेंडू डी सर्कलमध्ये घेऊन जाताना दिसले. गोलरक्षक कृष्णा पाठकने सुरेख बचाव केला. हरमनप्रीतने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक ८ गोल केले आहेत. वेल्सच्या रुपर्ट शिफर्लीने गोलजाळीसमोर गोल करण्याचा सोपा प्रयत्न चुकवला अन् पहिल्या हाफमध्ये भारताची २-० अशी आघाडी कायम राहिली. ३२व्या मिनिटाला हरमनप्रीतचा पेनल्टी कॉर्नरवरील गोल फसला. 

ललित उपाध्याय व आकाशदीप यांच्या सुरेख खेळाने वेल्सच्या खेळाडूंना हैराण केले. ४१व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हरमनप्रीतने कोणतीच चूक न करता हॅटट्रिक पूर्ण केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने ३-० अशी आघाडी मजबूत केली. त्यानंतर गुरजंतने सुरेख गोल केला, परंतु डेंजरस प्ले असल्याने तो नाकारण्यात आला. भारताने रेफरर घेतला अन् पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. ४९व्या मिनिटाला गुरजंत सिंगने गोल करून ४-० अशी आघाडी मिळवून दिली. ५१व्या मिनिटाला भारताचा गोली पाठक याने सुरेख बचाव केला. 

५५व्या मिनिटाला वेल्सकडून गॅरेथ फरलाँगने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करून पिछाडी १-४ अशी कमी केली. अखेरच्या ५ मिनिटांत वेल्सकडून आक्रमण वाढताना दिसले. त्यामुळे भारतीय खेळाडू बचावावर भर देऊन आघाडी कायम राखत होते. भारताने ४-१ असा विजय पक्का करताना १० गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
 

Web Title: Commonwealth Games 2022 Hockey : Hat-trick by Harmanpreet Singh, 1 goal from Gujant Singh, Indian men's hockey team beat Wales and enter into Semi Finals 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.