सराव सामना
By Admin | Updated: July 2, 2014 00:33 IST2014-07-02T00:33:25+5:302014-07-02T00:33:25+5:30
सराव सामन्यात डर्बिशायर ५ बाद ३२६

सराव सामना
स ाव सामन्यात डर्बिशायर ५ बाद ३२६डर्बिशायर : इंग्लंडविरुद्ध सुरूहोणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी आजपासून प्रारंभ झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात डर्बिशायरने दिवसअखेर ५ बाद ३२६ धावांची मजल मारली. या लढतीत डर्बिशायरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला़ त्यांनी पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत २५़४ षटकांत २ बाद ७९ धावांपर्यंत मजल मारली होती़ त्यांचा कर्णधार चेस्ने ह्युज ६० चेंडूंत ४ चौकारांसह २३ धावा बनविल्यानंतर उपाहारापूर्वी रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होऊन बाद झाला़ तो डर्बिशायरच्या दुसऱ्या गड्याच्या रूपाने बाद झाला, तेव्हा बेन स्लेटर ३९ धावांवर खेळत होता़या सराव सामन्यालाही प्रथम श्रेणीचा दर्जा नसल्यामुळे भारताने आपल्या १८ खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे़ डर्बिशायरतर्फे बी.टी. स्लेटर (५४), बी.ए. गोडलमॅन (नाबाद ६७), डब्ल्यू. जे. डर्स्टन (९५) व एच. आर. हुसेन (नाबाद ५३) यांनी अर्धशतके झळकाविली. भारतातर्फे रवींद्र जडेजाने दोन तर पंकज सिंग, पांडे व स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. ईशांत शर्माने १२ षटकांत ४९ धावा बहाल केल्या, पण बळीच्या बाबतीत त्याची पाटी कोरीच राहिली. (वृत्तसंस्था)