कोलंबियाचा सलग दुसरा विजय

By Admin | Updated: June 20, 2014 04:46 IST2014-06-20T04:41:04+5:302014-06-20T04:46:14+5:30

कोलंबियाने आयव्हरी कोस्टचा गुरुवारी ‘क’ गटाच्या सामन्यात 2-1 ने पराभव करीत फिफा विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदविला.

Colombia's second consecutive win | कोलंबियाचा सलग दुसरा विजय

कोलंबियाचा सलग दुसरा विजय

>उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग मोकळा : आयव्हरी कोस्टवर 2-1 ने मात
ब्रासिलिया : कोलंबियाने आयव्हरी कोस्टचा गुरुवारी ‘क’ गटाच्या सामन्यात 2-1 ने पराभव करीत फिफा विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदविला. या विजयामुळे कोलंबियाचा उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. 
सामन्यातील तिन्ही गोल उत्तरार्धातील खेळात नोंदले गेले हे विशेष. कोलंबियाकडून 64 व्या मिनिटाला रॉड्रिग्जने खाते उघडल्यानंतर 7क् व्या मिनिटाला क्वींटेरो याने ही आघाडी दुप्पट केली. आयव्हरी कोस्टकडून 73 व्या मिनिटाला जर्विन्हो याने गोल नोनदवून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या, पण यानंतर गोल नोंदविण्यात आयव्हरीच्या खेळाडूंना अपयश आल्यामुळे कोलंबियाने सरशी साधली. या विजयात गोलकिपरचेदेखील मोठे योगदान राहीले. त्याने आयव्हरीच्या खेळाडूंचे वारंवार झालेले हल्ले शिताफीने परतवून लावले. 
मध्यांतरार्पयतच्या खेळात आयव्हरी कोस्ट आणि कोलंबिया गोल नोंदविण्याची कोंडी फोडण्यात अपयशी ठरल्याने गोलशून्य बरोबरी झाली होती. कोलंबियाचा स्ट्रायकर टेयोफिलो गुटिरेज याला 28 व्या मिनिटाला गोल नोनदवून आघाडी घेण्याची नामी संधी  होती, पण त्याने मारलेला चेंडू गोलजाळीचा अचूक वेध घेऊ शकला नाही. यानंतर उभय संघांना गोल नोंदविता येईल अशी हमखास संधी मिळालीच नाही. आयव्हरी कोस्टचा चर्चित खेळाडू डिडियर ड्रोग्बा याला पूर्वार्धातील खेळात अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नव्हते. (वृत्तसंस्था)

Web Title: Colombia's second consecutive win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.