जपानसमोर कोलंबियाचे आव्हान

By Admin | Updated: June 24, 2014 01:24 IST2014-06-24T01:24:57+5:302014-06-24T01:24:57+5:30

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी जपान आणि कोलंबिया एकमेकांशी झुंजतील़ कोलंबियाने आधीच स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळविला आह़े

Colombia's challenge before Japan | जपानसमोर कोलंबियाचे आव्हान

जपानसमोर कोलंबियाचे आव्हान

>कुईआबा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी जपान आणि कोलंबिया एकमेकांशी झुंजतील़ कोलंबियाने आधीच स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळविला आह़े मात्र, जपानसाठी हा सामना ‘करा अथवा मरा’ असा असणार आह़े 
कोलंबिया संघाने आपल्या गत दोन्ही लढतीत विजय मिळवून सहा गुणांची कमाई केली आह़े हा संघ बाद फेरीत पोहोचला आह़े त्यामुळे जपानविरुद्धच्या लढतीत हा संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल़ 
जपानच्या खात्यात एका ड्रॉसह एक गुण आह़े कोलंबियाविरुद्धच्या लढतीत त्यांना मोठा उलटफेर करता आला, तर त्यांच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम राहणार आहेत़ मात्र, त्यांना यासाठी आपल्या गटातील इतर संघाच्या परिणामांवर अवलंबून राहावे लागणार आह़े 
कोलंबिया संघातील दुखापतग्रस्त खेळाडू लुईस पेरेरा यांच्या जागी संधी मिळालेला क्रिस्टीयन जपाता आणि कर्णधार मारिओ येप्स यांच्यावर संघाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असणार आह़े कोलंबियाचा जपाता म्हणाला, जपानविरुद्धची लढत चुरशीची होईल यात शंका नाही़ आमचा संघ जपानविरुद्ध गंभीरतेने खेळून विजय मिळवेल़ जपान संघाकडे या लढतीत आक्रमण करण्याशिवाय पर्याय नाही़ संघातील स्टार खेळाडू किसुके होंडा याच्या कामगिरीवर सर्वाची नजर असणार आह़े या शिवाय संघातील खेळाडू नागाटोमो आणि विंगर सुटो यांच्याकडूनही सवरेत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा राहील़ (वृत्तसंस्था)

Web Title: Colombia's challenge before Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.