कोलाज स्पोर्ट्स फायनलमध्ये

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

नवी दिल्ली: नमन शर्मा (नाबाद 40) याची शानदार फलंदाजी आणि अरुणा चपराणा (18 धावात तीन बळी) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलाज स्पोर्ट्स क्लबने टेलिफकन क्लबचा पाच विकेट्सने पराभव करीत 39 व्या रघुवीर सिंग हॉट वेदर क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली़ येथे मॉडर्न स्कूलच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत सकाळी खेळप?ी ओलसर झाल्यामुळे सामना 15-15 षटकांचा करण्यात आला़ अरुणने भेदक गोलंदाजी करताना 18 धावात तीन बळी घेतल़े तर शाहबाज नदीमनेदेखील 14 धावात तीन बळी घेतल़े प्रत्युत्तरात टेलिफकन संघ 15 षटकात 6 विकेट्सवर 124 धावा केल्या़ अंकित मॅनीने 35 चेंडूमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 57 धावा केल्या़ अंकित डबासने 38 धावांचे योगदान दिल़े कोलाज स्पोर्ट्स क्लबने 14़1 षटकात पाच बाद 128 धावा करीत विजय मिळवला़ नमन शर्मान्

In Collage Sports Final | कोलाज स्पोर्ट्स फायनलमध्ये

कोलाज स्पोर्ट्स फायनलमध्ये

ी दिल्ली: नमन शर्मा (नाबाद 40) याची शानदार फलंदाजी आणि अरुणा चपराणा (18 धावात तीन बळी) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलाज स्पोर्ट्स क्लबने टेलिफकन क्लबचा पाच विकेट्सने पराभव करीत 39 व्या रघुवीर सिंग हॉट वेदर क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली़ येथे मॉडर्न स्कूलच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत सकाळी खेळप?ी ओलसर झाल्यामुळे सामना 15-15 षटकांचा करण्यात आला़ अरुणने भेदक गोलंदाजी करताना 18 धावात तीन बळी घेतल़े तर शाहबाज नदीमनेदेखील 14 धावात तीन बळी घेतल़े प्रत्युत्तरात टेलिफकन संघ 15 षटकात 6 विकेट्सवर 124 धावा केल्या़ अंकित मॅनीने 35 चेंडूमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 57 धावा केल्या़ अंकित डबासने 38 धावांचे योगदान दिल़े कोलाज स्पोर्ट्स क्लबने 14़1 षटकात पाच बाद 128 धावा करीत विजय मिळवला़ नमन शर्माने अवघ्या 27 चेंडूमध्ये नाबाद 40 धावा केल्या़ यामध्ये चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश आह़े शिवम चौधरीने 11 चेंडूमध्ये ताबडतोब 24 धावा केल्या़ यामध्ये चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश आह़े रॉबिन बिस्टनेदेखील चार चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या़ नमन शर्माला सामनावीरने सन्मानित केल़े दुसरा उपांत्य सामना 16 जूनला आरपी अकॅडमी आणि मद्रास क्लब यांच्यात होणार आह़े

Web Title: In Collage Sports Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.