सांघिक योगदानामुळेच ‘क्लीन स्वीप’
By Admin | Updated: October 13, 2016 01:10 IST2016-10-13T01:10:11+5:302016-10-13T01:10:11+5:30
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने कसोटी मालिकेत न्यूझीलंडची ३-० ने शिकार करीत क्लीन स्वीप केले. हा सांघिक प्रयत्नांचा विजय होता.

सांघिक योगदानामुळेच ‘क्लीन स्वीप’
नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने कसोटी मालिकेत न्यूझीलंडची ३-० ने शिकार करीत क्लीन स्वीप केले. हा सांघिक प्रयत्नांचा विजय होता.भारताच्या तुलनेत न्यूझीलंडचे गोलंदाज केवळ ४२ गडी बाद करू शकले. त्यात मिशेल सेंटेनर आणि ट्रेंट बोल्ट यांच्या बळींचा वाटा प्रत्येकी दहा होता. आश्विनने या मालिकेत अनेक विक्रम केले. ३९ कसोटी सामन्यांत एकूण २२० बळी घेणाऱ्या आश्विनने सहा वेळा दहापेक्षा अधिक गडी बाद करण्याची किमया साधली आहे. इंदूर कसोटीत खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला अनुकूल नव्हती, तरीही तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आश्विनचा मारा खेळणे फलंदाजांना कठीण जात होते. यावरून आश्विनचे कौशल्य सिद्ध झाले. तरीही त्याने जडेजाला आदर्श गोलंदाज संबोधले. जडेजाने मधूनमधून गडी बाद करीत आपल्याला साथ दिली, असे त्याचे मत होते.
भुवनेश्वर कुमार याने कोलकाता कसोटीत पाच गडी बाद केले. मोहंमद शमीनेदेखील आठ बळी घेतले. शमीचे रिव्हर्स स्विंग पाहण्यासारखे होते.