रशियाच्या सर्व ११बॉक्सर्सना क्लीन चिट
By Admin | Updated: August 4, 2016 20:51 IST2016-08-04T20:51:41+5:302016-08-04T20:51:41+5:30
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (आयबा)रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या रशियाच्या सर्व ११ बॉक्सर्सना स्पर्धेत खेळण्याची परवानगी बहाल केली आहे.

रशियाच्या सर्व ११बॉक्सर्सना क्लीन चिट
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ४ : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (आयबा)रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या रशियाच्या सर्व ११ बॉक्सर्सना स्पर्धेत खेळण्याची परवानगी बहाल केली आहे. आयबाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या खेळाडूंची योग्यता पडताळणी करणाऱ्या आयओसीच्या तीन सदस्यांच्या पॅनलने हा निर्णय दिला.
११ पैकी प्रत्येक बॉक्सरने डोपिंगबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आयओसीच्या समीक्षा पॅनलने सर्व ११ खेळाडूंना स्पर्धेसाठी योग्य ठरविले. हे सर्व ११ खेळाडू डोपिंगमध्ये अडकलेल्या रशियाच्या खेळाडूंमधून क्लीन चिट मिळविणारे पहिलेच खेळाडू ठरले. रशियाच्या ट्रॅक अॅन्ड फिल्ड खेळाडूंवर आधीच बंदी आहे.