स्पर्धा उंबरठय़ावर, तरीही काम सुरूच

By Admin | Updated: June 6, 2014 09:21 IST2014-06-06T00:56:19+5:302014-06-06T09:21:20+5:30

क्रीडाप्रेमींच्या आगमनाचा सिलसिला सुरू होण्याआधी ब्राझीलमधील स्टेडियम, विमानतळ, रस्ते आणि फोन नेटवर्क या कामांना अंतिम स्वरूप देण्याचे काम जोरात सुरू आहे.

At the clash of competition, continue to work | स्पर्धा उंबरठय़ावर, तरीही काम सुरूच

स्पर्धा उंबरठय़ावर, तरीही काम सुरूच

>साओ पाऊलो : फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा उंबरठय़ावर आली असली, तरी या स्पर्धेची तयारी अजूनही सुरूच आहे. जगभरातील हजारो क्रीडाप्रेमींच्या आगमनाचा सिलसिला सुरू होण्याआधी ब्राझीलमधील स्टेडियम, विमानतळ, रस्ते आणि फोन नेटवर्क या कामांना अंतिम स्वरूप देण्याचे काम जोरात सुरू आहे. सर्वच 12 यजमान शहरांतील विमानतळ आणि हजारो मजूर पार्किग तयार करण्यास आणि चेक इन काऊंटर स्थापन करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. हजारो फुटबॉलप्रेमींच्या स्मार्टफोनच्या आवश्यकता पूर्ण केल्या जाव्यात, यासाठीही अनेक स्टेडियममध्ये मजूर सेल फोन नेटवर्कला स्थापन करण्यास गुंतलेले आहेत.
राष्ट्रपती डिल्मा रुसेफ यांनी ब्राझीलमध्ये विश्वचषकाची सर्व तयारी वेळेत पूर्ण केली जाईल, असे वचन दिले होते; पण तसे झाले नाही.  ते म्हणाले, जगातील काही गोष्टी या नियोजित वेळेत होऊ शकत नाहीत. कदाचित चीनमध्ये होत असतील. आम्ही अशा त:हेने लोकतंत्रची किंमत चुकवत आहोत.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष ब्लेटर यांनीही योजना नियोजित वेळेत पूर्ण होत नसल्याचे पाहून निराशा व्यक्त केली. तरीदेखील ते म्हणाले, बाझीलही स्पर्धेचे यजमानपद यशस्वीपणो पार पाडेल. या खेळाची लोकप्रियता  आणि चाहत्यांतील खेळाविषयी असलेला ज्वर, तसेच फुटबॉल खेळण्यासाठी ब्राझीलची क्षमता या विश्वचषकाला विशेष बनवत आहे.  (वृत्तसंस्था)
 
प्रेक्षकांच्या 
व्यवस्थेकडे दुर्लक्ष
4साओ पाऊलो स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बसण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष दिले गेले नाही. या स्टेडियममध्ये 12 जूनला वर्ल्डकप स्पर्धेचा उद्घाटनीय सामना होणार आहे. 
4पूर्वोत्तर शहर साल्वाडोरमध्ये 
13 वर्षाच्या निर्माणानांतर अखेर मेट्रोचे ट्रायल सुरू झाले आहे. वर्ल्डकपसाठी जितक्या योजना आखल्या होत्या, त्यातील फक्त अध्र्याच पूर्ण झाल्या आहेत.
4195क्नंतर देशात प्रथमच होणारी ही स्पर्धा संस्मरणीय ठरवण्याविषयी मात्र साशंकता व्यक्त होत आहे. 

Web Title: At the clash of competition, continue to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.